कपिल शर्मा यांनी घेतली मनमोहन सिंग यांची भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छोट्या पडद्यावरील विनोदी कलाकार अभिनेता कपिल शर्माने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान कपिल शर्मा याने अमृतसर शहराच्या आठवणी हि मनमोहन सिंग यांच्या सोबत जागवल्या आहेत. मनमोहन सिंग आणि त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांच्या सोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट करून कपिल शर्मा याने या बाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मनमोहन सिंग यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि मृदुभाषी आहे. त्यांच्या घरी मला खूप आदरातिथ्य मिळाले असे त्याच्या ट्विट मध्ये कपिल शर्माने नमूद केले आहे. त्यांच्या सोबत खूप मोकळ्या गप्पा मारण्याचा योग आला असे देखील कपिल शर्मा म्हणाले आहे. त्याच प्रमाणे त्याने आपल्या कॉलेज आणि खाण्याबद्दल हि खूप चर्चा केली आहे.

तुमच्या सारख्या विनम्र आणि चांगल्या राजकारण्याशी बोलण्याचा आणि भेटण्याचा योग आला या बद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो असे कपिल शर्मा म्हणाले आहेत. कपिल शर्मा यांच्या मनमोहन सिंग भेटीचे औचित्य नेमके काय आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या भेटीच्या संदर्भात उलट सुलट चर्चांना वेग आला आहे.