कपिल शर्माचे लग्न दिसणार लाईव्ह ! 

मुंबई : वृत्तसंस्था – अनेक दिवसापासून चर्चेत असलेले कपिल शर्माचे लग्न आज १२ डिसेंबर रोजी गिन्नी चतरथ सोबत होणार आहे. या लग्नाचे विधी सुरु झाले असून कपिलचे जवळचे मित्र या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. कपिलचे चाहते त्याच लग्न लाईव्ह पाहू शकतील, असे म्हटले जात आहे. हे लग्न कपिल शर्मा K9 नामक युट्यूब चॅनलवर लाईव्ह दिसेल. अर्थात ते वेळ आल्यावरच कळेल.

या लग्नाचे अनेक व्हिडियो,फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॉमेडियन भारती सिंग, कृष्णा अभिषेक, सुमोना चक्रवर्ती, राजीव ठाकूर, गायिका ऋचा शर्मा असे सगळे या लग्नात उपस्थित असल्याचे दिसून येत आहे. ‘द कपिल शर्मा’शोची संपूर्ण टीम या लग्नाला हजर आहे. काल  रात्री  ‘माता की चौकी’ कार्यक्रमात कपिल आणि त्याच्या मित्रांनी धमाल केली असून कपिल ने हे फोटो चाहत्यांसोबत  शेअर केले आहेत.

तसेच एका व्हिडियोत कपिलच्या आईने  ऋचा शर्माच्या गाण्यावर ताल धरलेला दिसत आहे. हा व्हिडीओ ही व्हायरल होत आहे. मिळालेल्या  माहितीनुसार कपिलसुद्धा दोन पद्धतीने लग्न करणार आहे . १२ डिसेंबरला हिंदू पद्धतीने आणि १३ डिसेंबरला पंजाबी पद्धतीने मात्र अजून या बातमीला दुजोरा मिळालेला नाही.