‘या’ सिंगरनं हातावर काढला कपिल शर्माच्या नावाचा Tattoo ! कारण वाचून म्हणाल…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सिंगर कुणाल शर्मा (Kunal Sharma) यानं कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) च्या नावाचा टॅटू बनवला आहे. कुणालनं त्याच्या उजव्या हातावर कपिलच्या नावाचा टॅटू बनवला आहे. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल की, त्यानं कपिलच्या नावाचा टॅटू का काढला आहे. यामागील कारण आपण जाणून घेणार आहोत.

कपिलच्या कॉमेडीचा थेट परिणाम हा सिंगर कुणालच्या घरवाल्यांवर पडला आहे. कपिलच्या कॉमेडीमुळंच कुणालच्या वडिलांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. हेच कारण आहे की, कुणाल आता कपिलचा खूप मोठा फॅन बनला आहे.

अलीकडेच्या दिलेल्या एका मुलाखतीत कुणाल म्हणाला, एक वर्षापूर्वी माझ्या कुटुंबीयांमध्ये खूप निगेटिव्हिटी होती. माझं घर अंधारलं होतं. घरातील लोक आपापसात बोलत नव्हते आणि एकमेकांसोबत वेळही घालवत नव्हते. माझ्या वडिलांची तब्येतही खराब झाली होती आणि औषधांचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता.

कुणाल म्हणाला, जेव्हापासून घरच्यांनी कपिलचा शो पाहायला सुरुवात केली आहे तेव्हापासून घरात पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात झाली आहे. घरातील मंडळ एकत्र बसून हा शो बघतात. माझ्या वडिलांच्या तब्येतीतही फरक पडत आहे. औषधांचा त्यांच्यावर परिणाम होताना दिसत आहे.

कुणालचे वडील बरे झाल्यानंतर कुणालनं त्यांना कपिलला भेटण्यासाठी मुंबईला नेलं. तेव्हा त्यानं टॅटू बनवला नव्हता. परंतु नंतर पुन्हा एकदा कुणाल कपिलला भेटला आणि त्यानंतर दोघांमध्ये चांगला बाँड तयार झाला. यानंतर कुणालनं उजव्या हातावर कपिलचा टॅटू काढला. सध्या कुणाल या टॅटूमुळं चर्चेत आहे.