कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीनं शेअर केला ‘बिकिनी’ फोटो ! म्हणाली- ‘Missing…’

पोलिसनामा ऑनलाइन –द कपिल शर्मा शोमध्ये कपिलच्या ऑनस्क्रीन पत्नीचा रोल साकारणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती अलीकडेच आपल्या एका हॉट फोटोमुळं चर्चेत आली होती. कपिल शर्मा शो मधून तिनं खूप लोकप्रियता मिळवली आहे. नुकताच तिनं बिकीनीतील फोटो शेअर केला आहे जो सध्या चर्चेत आला आहे. या सुमोना खूपच बोल्ड दिसत आहेत. सध्या तिचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

सुमोनानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात सुमोना बिकिनीत दिसत आहे. समुद्रकिनारी बसलेली सुमोना समुद्राला न्याहाळात आहे. तिचा हा थ्रोबॅक फोटो आहे. रेती आणि समुद्राची आठवण येत आहे असंही तिनं कॅप्शनमधून सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वीच सुमानोनं सध्या थायलंडमध्ये हॉलिडे एन्जॉय करतनाचे काही फोटो शेअर केले होते. यातही तिनं बिकीनी अवतार दाखवला होता. या फोटोत तिनं आपला आपल्या पायावर काढलेला टॅटू फ्लाँट केला होता. तिचे हे फोटोही खूप चर्चेत राहिले होते. यानंतर पुन्हा एकदा तिनं बिकीनी लुकनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

चाहत्यांनी सुमोनाच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.चाहत्यांचा सुमोनाचा बोल्ड बिकिनी लुक आवडला आहे यात शंका नाही.