Kapil Sibal | ‘ते दिग्गजही संन्यास घेतात, मग काँग्रेसचं नेतृत्त्व दुसऱ्या कोणाकडे का देत नाही ?’ – कपिल सिब्बल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Kapil Sibal | नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections) भाजप (BJP) आणि आम आदमी (AAP) पक्ष सोडला तर इतर कोणाला यश आलं नाही. भाजपला चार राज्यात विजय मिळवता आला मात्र पंजाबमध्ये (Punjab) केजरीवालांच्या झाडूने सर्वांची सफाई केली. तर काँग्रेस (Congress) पक्षाला मात्र कुठेही यश मिळवता आलं नाही. याच पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी थेट काँग्रेसच्या नेतृत्त्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

 

सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांना पण एक दिवस निवृत्त व्हावं लागलं होतं. इथे गावसकर यांच्यासोबत काम करता येत नाही. सचिन तेंडुलकरलाही (Sachin Tendulkar) एक दिवस निवृत्त व्हावं लागलं होतं. काल परवा पर्यंत विराट कोहलीही (Virat Kohli) संघाचा कर्णधार होता. तिघांचीही नावं इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिली गेली आहेत. असा विचार महान लोकही करत असतील तर आपणही जे पराभव (lost) पाहिले आहेत त्यानंतर तरी नेतृत्वाने आपली जागा दुसऱ्यांना दिली पाहिजे, असं म्हणत कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह आणलं आहे.

 

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) पक्षाचे अध्यक्ष नाहीत, सोनिया गांधी (Sonia Gandhi) या पक्षाच्या अध्यक्ष आहेत मात्र राहुल गांधी पंजाबमध्ये गेले होते.
त्यावेळी त्यांनी चरणजित सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) हे पंजाबचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली.
मात्र त्यांनी ही घोषणा कोणत्या अधिकारात केली ? ते तर आता अध्यक्ष नाहीत.
ते आधीपासून पक्षाचे अप्रत्यक्ष अध्यक्ष आहेत.
मात्र ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अध्यक्ष झाले तर काय फरक पडतो, असा सवाल कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी केला आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला फटका बसला. दुसरीकडे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपवर कृषी कायद्यांमुळे पंजाबमधील लोकांच्या मनात त्यांच्याविरोधात असंतोष होता.
केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्लीमध्ये (Delhi) केलेली सुधारणा पाहून आम आदमीला जनतेने कौल दिल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Kapil Sibal | sunil gavaskar sachin tendulkar virat kohli all retired kapil sibal asked questions to gandhi family

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा