बोनी कपूर यांनी कमी केलं 12 किलो वजन, जान्हवी कपूरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचे आपले वडिल बोनी कपूर वर खूप प्रेम आहे हे सर्वजण जाणतात. कारण तिच्या आईनंतर आता कोणी असेल तर ते म्हणजे तिचे वडिल. बोनी कपूर देखील आपल्या मुलींची खास काळजी घेताना दिसतात.

त्यांना अनेकदा पार्टी, फंक्शन आणि कार्यक्रमात एकत्र पाहिलं आहे त्यातूनही त्यांची बाँडिंग दिसून येते. नुकताच जान्हवी कपूरने एक फोटो शेअर करत आपले वडिलांवरील प्रेम व्यक्त केले आहे. इंस्टाग्रामवर स्टोरीला तिने एक फोटो शेअर करत बोनी कपूर यांचं कौतुकही केलं आहे.

 

तुम्हाला सांगू इच्छितो की, जान्हवी कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात बोनी कपूरांचा फोटो आहे. हा फोटो पाहिला तर लगेच तुमच्या लक्षात येईल की, बोनी कपूर पहिल्यापेक्षाही स्लिम दिसत आहे. या स्टोरीच्या कॅप्शनमध्ये जान्हवी लिहिते की, “पप्पांनी 12 किलो वजन कमी केलं आहे. स्लिम ट्रीम अँड हेल्दी. मला तुमचा अभिमान आहे.” फोटो पाहिला तर लक्षात येईल की, हा फोटो जान्हवीच्या इंस्टाग्राम स्टोरीचा आहे.

View this post on Instagram

Lurrvv u most #hbd 🐨

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या जान्हवी कपूर तिच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. देशाची पहिली आयएएफ ऑफिसर गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा असणार आहे. या सिनेमात जान्हवी गुंजन सक्सेनाचा रोल करणार आहे. जान्हवीचे चाहते तिच्या या सिनेमाबाबत खूपच उत्साहित असल्याचे दिसत आहेत. याशिवाय जान्हवी तख्त या सिनेमातही दिसणार आहे. यात तिच्यासोबत करीना कपूर, रणवीर सिंग, विकी कौशल आणि अनिल कपूर हे कलाकारही दिसणार आहेत.

View this post on Instagram

Baby kuala w papa kuala 🐨🐨

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

फीचर नावाचा फोटो फीचरला घेणे बातमीच्या आत दिलेला फोटो तो तसाच आत ठेवणे

Loading...
You might also like