Karad Crime | वारुंजी येथे 2 वर्षांच्या बालकासह महिलेचा आढळला मृतदेह; परिसरात खळबळ

कराड : पोलीसनामा ऑनलाइन – Karad Crime | कराड तालुक्यातील वारुंजी (Varunji) येथील एका घरात महिलेसह 2 वर्षाच्या बालकाचा मृतदेह आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ (Karad Crime) उडाली आहे. ते दोघेही मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कराड तालुक्यातील वारूंजी येथील सत्यजीत पतसंस्थेच्या पाठीमागील परिसरात आज (मंगळवारी) सकाळी सुशिला सुनील शिंदे (Sushila Sunil Shinde) (वय, 35) आणि विराज निवास गायकवाड (Viraj Niwas Gaikwad) (वय, 2 वर्ष ) यांचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान हा आढळून आलेला मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने तेथील परिसरात दुर्गंधी पसरली होती. याबाबत सर्व प्रकार तेथील स्थानिकांनी पोलिसांना (Police) सांगितला आहे. सध्या हे वारूंजी येथे भाड्याने रहायला असल्याचे समजते.

दरम्यान, या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपअधिक्षक
रणजीत पाटील (Ranjit Patil), वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील घटनास्थळी दाखल झाले. या महिलेचा व बालकाचा खून झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी (Police) वर्तवली असून वेगाने तपास सुरू करत पोलिसांनी चौकशी सुरू केलीय.

हे देखील वाचा

Sharad Pawar | नारायण राणे प्रकरणावर शरद पवारांनी दिली मोजक्या शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले…

Salary Slip | नोकरीमध्ये सॅलरी स्लिपचे काय आहे महत्व, जाणून घ्या कामाच्या 10 महत्वाच्या गोष्टी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Karad Crime | body woman two year old child was found suspected murder karad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update