Karad Crime | 2 चिमुकल्यांची गळा दाबून हत्या; आईचा आत्महत्येचा प्रयत्न

कराड : पोलीसनामा ऑनलाइन Karad Crime | कराडमधील एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आपल्या दोन लहान बालकांचा गळा दाबून आईनेच हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर खुद्द आईनेच आत्महत्येचा (suicide) प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे कराड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना कराड येथील रुक्मिणी नगर परिसरात (Karad Crime) घडली आहे. मात्र याबाबत सर्व घटना बुधवारी सकाळी समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हर्ष आवटे (Harsh Awate) (वय, 8 वर्ष) आणि आदर्श आवटे (Adarsh Awate) (वय, 6 वर्ष) अशी या चिमुकल्यांची नावे आहेत. तर अनुष्का सुजित आवटे (Anushka Sujit Awate) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आईचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहिली असून पतीचा विरह सहन होत नसल्याने आम्ही आमचे जीवन संपत असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. अनुष्का यांचे पती सुजित यांचा सुमारे सहा महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू (Accidental death) झाला आहे. त्यांच्या मृत्यूचा विरहामुळे आम्ही हे पाऊल उचलत असल्याचे अनुष्काने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे.

या दरम्यान, अनुष्का यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस उप अधीक्षक डॉ. रणजीत पाटील (dysp Dr. Ranjit Patil), वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील (Sr. PI B. R. Patil) , पोलिस निरीक्षक राहुल वरुटे (PI Rahul Varute) यांनी भेट दिली.

 

Web Title : Karad Crime | Strangulation of 2 chimpanzees; Mother’s suicide attempt

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Worlds Safest City | जगातील सर्वात Safe शहरांमध्ये डेन्मार्कचे Copenhagen पहिल्या नंबरवर, जाणून घ्या दिल्ली अन् मुंबईचा नंबर

Pune Crime | तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन फरार झालेली टोळी गजाआड

RBI Rules | 50 हजारपेक्षा जास्तीचा चेक देणे ठरू शकते अडचणीचे; जाणून घ्या काय आहे RBI चा नवीन नियम?