टोळी युध्दातून घरात घुसून 11 गोळ्या झाडून गुंडाचा निर्घृण खून

कराड : पोलीसनामा ऑनलाइन – कराड शहरातील मध्यवस्तीत घरात घुसून युवकावर 11 गोळ्या झाडून निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच जमावाने गोधळ घालण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवले. या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता आहे. हा खून टोळी वचर्स्वातून करण्यात आला असल्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.

पवन दिपक सोळवंडे (वय-२४ रा. बुधवार पेठ, कराड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच जमावाने एक दुचाकी आणि एक रिक्षाची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण कण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले मात्र, जमावाकडून गोंधळ सुरुच राहिल्याने अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवन सोळवंडे हा काराड येथील बुधवार पेठेत राहतो. त्याच्यावर खंडणी, जबरी चोरी, मारहाण अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. हा खून टोळी वर्चस्वातून झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पथके रवाना
करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ करीत आहेत.

You might also like