कृष्णा नदीत अंघोळीला गेलेल्या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

कराड : पोलीसनामा ऑनलाइन  –   रंगपंचमीच्या दिवशी कोयना-कृष्णा नदीच्या प्रीतीसंगमावर अंघोळीसाठी गेल्यावर नदीच्या पाण्यात बुडून शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सोहम शशिकांत कुलकर्णी ( सोमवरपेठ कराड) असे मृत मुलाचे नाव आहे.

पालकर शाळेचा विद्यार्थी असणारा सोहम याचे मुळ गाव पाटण तालुक्यातील निव्हाकणे हे आहे. होळीच्या पाचव्या दिवशी कराड येथे रंगपंचमीचा सण साजरा होतो. रंग खेळून झाल्यावर अनेक मुले अंघोळीसाठी कोयना व कृष्णा नदीला जातात. सोहम याच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मागे आई, वडील आणि एक बहीण असा परिवार आहे.