होय, ‘कुछ कुछ होता है’ सिनेमातील ‘ती’ गोष्ट चुकीचीच, करण जोहरचा ‘कबुली’नामा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 90 च्या दशकात आलेला शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी स्टार कुछ कुछ होता है सिनेमा खूपच गाजला. करण जोहरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. हा सिनेमा प्रेक्षकांनी खूपच डोक्यावर घेतला. परंतु या सिनेमात एक मोठी चूक झाल्याची कबुली करण जोहने दिली आहे. एका मुलाखतीत तो बोलत होता.

मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सवात आपल्या चुकीची कबुली देताना करण जोहर म्हणाला की, “कुछ कुछ होता है हा सिनेमा नैतिकदृष्ट्या चुकीचा होता. मला आठवतंय की, शबाना आझमी यांनी हा सिनेमा युकेमध्ये कुठेतरी पाहिला होता. मला त्यांनी फोन केला. त्या खूप चिडल्या होत्या. त्या म्हणाल्या, हे तू काय दाखवलं आहेस ? त्या मुलीचे केस लहान असतात तेव्हा ती आकर्षक दिसत नाही आणि जेव्हा तिचे केस मोठे होतात तेव्हा ती सुंदर दिसते ? मी त्यांची माफीही मागितली. त्या म्हणाल्या तुला एवढंच म्हणायचं आहे का ? मी म्हणालो हो. कारण तुम्ही जे म्हणत आहात ते योग्य आहे.

आधी टॉमबॉय सारख्या दिसत असलेल्या काजोलचा मेक ओव्हर होताच शाहरुख अचानक तिच्या प्रेमात पडतो यावर शबाना यांनी आक्षेप घेतला. आजही हा सिनेमा प्रेक्षक तेवढ्याच आवडीने पाहतात. रवीना टंडन, ऐश्वर्या रॉय, उर्मिला मातोंडकर, शिल्पा शेट्टी, ट्विंकल खन्ना, तब्बू या अभिनेत्रींनी या सिनेमासाठी नकार दिला होता.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like