करण जोहरचं ‘याच्याशी’ अफेअर ?, ‘त्या’ फोटोमुळं बाॅलिवूडमध्ये चर्चेला उधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध आणि यशस्वी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर नेहमीच काहीना काही कारणांसाठी चर्चेत असतो. नुकताच करणचा ४७ वा वाढदिवस पार पडला. त्यानंतर करणचा एक फोटो बी-टाऊनमध्ये चर्चेचा विषय बनत आहे. हा फोटो नेपाळी वंशाचा अमेरिकन फॅशन डिझायनर प्रबळ गुरुंग आणि करणचा आहे. या फोटोवरून या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरु असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

करणच्या वाढदिवसानिमित्त त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. त्यात प्रबळ गुरुंगनही इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट टाकून करणला शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे शुभेच्छा देताना त्यानं शेअर केलेला फोटो आणि त्याचे कॅप्शने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. फोटोमध्ये करण आणि प्रबळ एकमेकांना खेटून उभे आहेत. करणने प्रबळच्या गळ्यात हात टाकल्याचं दिसत आहे. या फोटोला ‘प्यार किया तो डरना क्या…’ असं कॅप्शन त्यानं दिल आहे. त्यावर करणनेही रिप्लाय दिला आहे. करणने ‘कंट्रोल युवरसेल्फ’ असं म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या करणकडे दोन मुलांचे पालकत्व आहे. त्याने लग्न केलेले नाही. त्यात प्रबळची पोस्ट आणि त्यावर करणनं दिलेल्या उत्तरामुळं दोघांमध्ये अफेअर सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. तसंच करणचा वाढदिवस दोघांनी न्यूयॉर्कमध्ये साजरा केल्याची माहिती मिळत आहे. त्यात प्रबळच्या इन्स्टा पोस्टनुसार, हे दोघे न्यूयॉर्कमधील ‘बूम बूम रूम’ हॉटेलमध्ये असल्याचे दिसत आहे. त्यामुळे चर्चांना अधिक रंग चढला आहे.

View this post on Instagram

Pyaar Kiya To Darna Kya. Happy birthday KJo.

A post shared by Prabal Rana Gurung (@troublewithprabal) on