करण जोहर आणि वरुण धवन यांनी केली गुरुपौर्णिमा साजरी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

बॉलिवूड चा आघाडीचा अभिनेता  वरुण धवन याने  कालचा गुरुपौर्णिमेचा  दिवस आपल्या गुरूच्या चरणी अर्पण करत साजरा केला आहे. आपलं जीवन घडवणाऱ्या गुरुंच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात येणारा   गुरुपौर्णिमा देशभरामध्ये सर्वत्र उत्साहात  साजरी करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या गुरुंप्रती आदर व्यक्त केली.त्यात बॉलिवूड चे कलाकार तरी  मागे का राहतील त्याप्रमाणेच बॉलिवूडमधील काही कलाकारांनीही आपल्या गुरुंचे आशिर्वाद घेतल्याचं पाहायला मिळालं.  वरुण धवन  ने आपले गुरु करण जोहर यांची भेट घेत त्याचे  चरणस्पर्श केले.  सध्या याच गुरु-शिष्याचा फोटो व्हायरल झाला  आहे.
[amazon_link asins=’B00KNOW2SQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1d21b331-9240-11e8-a1f7-6d136624d328′]
आजच्या घडीला अनेक जण सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या गुरुंना वंदन करतात.मात्र या साऱ्यांपासून एक पाऊल पुढे जात वरुणने त्याच्या गुरुंची अर्थात चित्रपट दिग्दर्शक करण जोहर यांची भेट घेतली असून त्यांच्या पाया पडून आशिर्वाद घेतला. वरुणने त्याच्या ट्वीटर हॅण्डलवरुन हा फोटो शेअर केला आहे.यावेळी करणनेदेखील एखाद्या गुरुला शोभतील असे फॉर्मल कपडे घातले आहेत. बुमरॅग केलेल्या या व्हिडिओला वरुणने ‘हॅप्पी गुरु पौर्णिमा’ असं नाव देत हा व्हिडीओ शेअर केला आहे.  हा   व्हिडिओ आतापर्यंत ३ लाख लोकांनी बघितला आहे.

बॉलीवूड मधला यशस्वी दिग्दर्शक करण जोहर आणि  एकाहून एक सरस चित्रपट देणारा वरुण  धवन  यांच्यातले गुरु शिष्याचे प्रेम वाढत राहो अश्या कंमेंट चाहत्यांनी दिल्या  आहेत.  लवकरच  वरुण धवन ‘सुई-धागा’ या चित्रपटात झळकणार असून अभिनेत्री अनुष्का शर्मा त्याच्याबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे.