14 व्या वर्षीच करण जोहरनं केला होता अ‍ॅक्टींगमध्ये ‘डेब्यू’, दूरदर्शनवर प्रसारीत झाली होती मालिका ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : करण जोहर यानं दिलवाले दुल्हनिया या सिनेमाच्या आधी इंद्रधनुष नावाच्या एका शोमध्ये कम केलं होतं. हा शो दूरदर्शनवर प्रसारीत केला गेला होता. खुद्द करणनंच असा खुलासा केला होता की, तो त्यावेळी 14-15 वर्षांचा होता. परंतु हा शो ऑन एअर होण्यासाठी खूप वेळ लागला होता. जेव्हा प्रसारीत झाला तेव्हा करण कॉलेजला सेकंड ईयरला होता आणि 18 वर्षांचा झाला होता. आता जेव्हा तो हा शो पाहतो तेव्हा त्याला खूप लाजल्यासारखं होतं.

1989 साली आलेला शो म्हणजे करणचा पहिला शो होता. यानंतर करणनं 1995 मध्ये आदित्य चोपडाच्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या सिनेमात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. यात त्यानं रॉकी नावाचा एक छोटासा रोलही प्ले केला होता. यानंतर 1998 मध्ये म्हणजेच तीन वर्षांनी करणनं त्याचा पहिला सिनेमा कुछ कुछ होता है डायरेक्ट केला. हा सिनेमा सुपरहिट झाला.

यानंतर कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना, माय नेम इज खान, स्टुडेंट ऑफ द ईयर असे अनेक सिनेमे त्यानं डायेरक्ट केले.टीव्ही शोनं सुरू झालेल्या त्याच्या प्रवासानं आज यशाची अनेक शिखरं गाठली आहेत. अ‍ॅक्टींगमध्ये नाही तर परंतु डायरेक्शन आणि प्रॉडक्शन लाईनमध्ये त्यानं त्याचं करिअर एका उंचीवर नेलं आहे. त्यानं बॉम्बे वेलवेट सिनेमात अ‍ॅक्टींग करून अ‍ॅक्टींगमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. परंतु काही खास जमलं नाही. आजही तो सिनेमात गेस्ट अपीरंस देत असतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like