करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीतील सर्व कलाकार दारूच्या नशेत ‘तर्रर्र’ ? (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवुडमधील अनेक अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांच्या नेहमीच पार्ट्या होत असतात. त्यातील दिग्दर्शक करण जोहरच्या पार्ट्या सर्वांनाच आवडतात आणि तो त्यासाठीही प्रसिद्ध आहे. करणच्या घरी काही दिवसांपूर्वी एक पार्टी झाली होती.

या पार्टीतील एक व्हीडिओ करणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हीडिओत पार्टीतील सर्व कलाकार दिसत आहे. या व्हीडिओमध्ये हे कलाकार दारूच्या नशेत असल्याचे बोलले जात आहे. त्या अवस्थेवरून त्यांच्यावर टीका होत आहेत.

या पार्टीमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, विक्की कौशल, अर्जुन कपूर, वरूण धवन, मलाइका आरोरा, शाहिद कपूर, मीरा राजपूत, जोया अख्तर, अयान मुखर्जी, हे सर्व दिसत आहेत. करणने काढलेल्या व्हीडिओमध्ये हे सर्व स्टार दिसत आहेत. तसंच यातील मीरा, अर्जुन,आणि शाहिद शुद्धीत असल्याचे म्हटलं जात आहे. तर बाकीच्यांनी दारू घेतल्याचे बोलले जात आहे.

व्हीडिओमध्ये कॅमेरा पुढे आल्यावर विक्कीने आपल्या नाकावर मारल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याने ड्रग्स घेल्याचे बोलले जात आहे. एका ट्वीटर युजरने तर बॉलीवुडचे स्टार्स पिलेले आहेत. आता त्यांनी दारू घेतली आहे की ड्रग्स सांगता येत नाही. मात्र कॅमेरा समोर आल्यावर आपल्या नाकावर मारणे म्हणजे काय असा, सवाल करण्यात येत आहे.

तसंच हा व्हीडिओ सुरु असताना या कलाकारांनाही माहित नसावे कारण कॅमेरा समोर आल्यानंतर अनेकांनी डचकल्याचे हावभाव दिले आहेत. तर अनेकांनी नशेत असल्यासारखे लूक दिले आहे. दीपिका तर या व्हीडिओच्या सुरुवातीलाच दिसत असून तिही एका स्टॅच्यू सारखी थांबलेली दिसत आहे.

दरम्यान, करणने शेअर केलेला हा व्हीडिओ आता पर्यंत १८ लाख लोकांनी पाहिला असून अनेकांनी यावर टीका केली आहे. तर अनेकांनी या व्हीडिओला लाईक केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय