आई हिरू जोहरनं करणला वाईट पद्धतीनं केलं ‘इग्नोर’ ! व्हायरल झाला व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोना व्हायरसमुळं सध्या देशभरात लॉकडाऊन लागू झाला आहे. सामान्य माणसांसोबतच आता बॉलिवूड कलाकारही घरातच आपला टाईम स्पेंड करत आहेत. डायरेक्टर करण जोहरदेखील त्याची मुलं यश आणि रूही यांच्यासोबत खपू एन्जॉय करत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो मुलांसोबतचे व्हिडीओ शेअर करत आहे. पुन्हा एखदा त्यानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर आहे जो सध्या व्हायरल होत आहे. यात करणची आई हिरू जोहर करणला सपशेल इग्नोर करताना दिसत आहे.

करणनं नुकताच एक व्हिडीओ इंस्टावरून शेअर केला आहे. व्हिडीओत करणची मुलं आणि आई देखील दिसत आहे. करण आईला काहीतरी बोलत आहे. परंतु आई हिरू त्याच्याकडे न पाहताच त्याला उत्तर देत आहे. करणदेखील हे बोलून दाखवत आहे की, हिरू त्याला ऐकत नाहीत. व्हिडीओ शेअर करताना करण जोहर म्हणतो, “आयुष्य खूप पजल्ड झालं आहे. माझ्याकडे हे आहे. मला कोणी अटेंशनच नाही देत.”

करणनं शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

करणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच करणचा आगामी सिनेमा तख्त येणार आहे. कोरोन व्हायरसमुळं सिनेमाच्या शुटींगला ब्रेक लागला आहे. करण तख्त सिनेमातून तब्बल 4 वर्षांनी डायरेक्शनमध्ये वापसी करत आहे.

पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग, भूमी पेडणेकर, आलिया भट, जान्हवी कपूर, विकी कौशल, करीना कपूर आणि अनिल कपूर लिड रोलमध्ये आहेत.