करण जोहरला युजर म्हणाला ‘सर्वात फेवरेट बायको’ ! आभार मानत डायरेक्टरनं दिलं ‘असं’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नेटफ्लिक्स (Netflix) वरील शो Fabulous Lives of Bollywood Wives सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. निर्माता करण जोहर (Karan Johar) आणि अपूर्व मेहता (Apoorva Mehta) यांचा हा शो आहे. या रिॲलिटी शोमध्ये संजय कपूरची पत्नी महीप कपूर, सोहेल खानची पत्नी सीमा खान, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे आणि समीर सोनीची पत्नी आणि ॲक्ट्रेस नीलम कोठारी सोनी दिसणार आहेत. फॅब्युलस लाईफ ऑफ बॉलिवूड वाईव्स या रिॲलिटी शोमध्ये स्टार्सच्या वाईफ कशी लाईफ जगतात हे दाखवण्यात आलं आहे. यात अनेक बडे चेहरे हे पाहुणे कलाकार म्हणून दिसत आहे.काहींना शो खूप आवडला तर काहींना मात्र हा शो अजिबात आवडलेला नाही.

करण जोहरनं इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात तो स्टार्स वाईव्ससोबत दिसत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अशात एका ट्रोलरनं ट्विट करत करणवर निशाणा साधत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु करणनं देखील मजेदार पद्धतीनं त्याला उत्तर दिलं.

ट्रोलरनं ट्विट करत लिहिलं की, मला वाटतं आपण याच्याशी सहमत असाल की, फॅब्युलस लाईफ ऑफ बॉलिवूड वाईव्समधील सर्वात फेवरेट वाईफ करण जोहर आहे.

करणनं रिट्विट करत याला उत्तर दिलं. करणनं लिहिलं की, या जोकनं मला खूप हसवलं. चांगला सेंस ऑफ ह्यमुर असलेले ट्रोल खरंच रिफ्रेशिंग असतात. थँक्स डॉक्टर.

https://twitter.com/karanjohar/status/1333107858091569152?s=20

करणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच करणचा आगामी सिनेमा तख्त येणार आहे. करण तख्त सिनेमातून तब्बल 4 वर्षांनी डायरेक्शनमध्ये वापसी करत आहे. पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग, भूमी पेडणेकर, आलिया भट, जान्हवी कपूर, विकी कौशल, करीना कपूर आणि अनिल कपूर लिड रोलमध्ये आहेत.