करण जोहर शूट करत होता ‘खासगी’ क्षण, हात जोडत विकी कौशल म्हणाला… (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा निर्माता करण जोहर काही दिवसांपूर्वीच आपल्या फॅशन आणि स्टाईलनं चर्चेत आला होता. यानंतर पुन्हा एकदा त्यानं आपल्या व्हिडीओतून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओत विकी कौशलही चर्चेचा विषय ठरला आहे. करण जोहर आणि विकी कौशलचा हा व्हिडीओ सध्या झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, करणचा हा व्हिडीओ एका प्रायव्हेच जेटमधील आहे. व्हिडीओत दिसत आहे की, करण जोहरनं हा व्हिडीओ शूट केला आहे. सुरुवातीला करण आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपकडे जातो आणि तिच्या ड्रेसची स्तुती करतो. यानंतर तो वरुण धवन, आयुष्मान खुराना, रणवीर सिंग अशा अनेक स्टार्सकडे जातो आणि त्यांच्या कपड्यांची स्तुती करतो. परंतु जेव्हा शेवटी तो विकी कौशलकडे पोचतो तेव्हा करण म्हणतो द कॉन्ट्रोव्हर्सियल व्हिडीओ मॅन. यावर विकी त्याला विनंती करत म्हणतो, “प्लीज करण व्हिडीओ शूट करू नकोस. मी तुला विनंती करतो शूट नको करूस.” विकीच्या वक्तव्यानंतर सर्वजण हसू लागतात. शेवटी व्हिडीओ कार्तिक आर्यनही दिसत आहे जो विकीच्या शेजारी आहे.

करणचा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. करणच्या चाहत्यांनीही या व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

You might also like