अभिनेता करण ओबेरॉय बलात्कार प्रकरणातील त्या वकीलाला अटक

मुबंई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता करण ओबेरॉय याच्यावर बलात्कार आणि मारहाणीचा आरोप करणाऱ्या महिलेवर काही जणांनी हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात मात्र धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी आता तिच्या वकिलाला अटक केली आहे. तिच्यावर करण्यात आलेला हल्ला हा पिडीतेला सहानुभूती मिळावी म्हणून तिच्या वकिलानेच घडवून आणल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना यापुर्वी अटक केली आहे.

अली काशिफ खान असे वकिलाचे नाव आहे. तर यापुर्वी जिशान अन्सारी (वय २३), अल्तमश (वय २२), जितीन संतोष कुरीयन (वय २२), अराफत अहमद अली (वय २२) या चार महाविद्यालयीन तरुणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी चौघांना अटक करून त्यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. महिलेचे वकिल अली काशीफ खान यांनीच हा कट रचला. असे त्यांनी चौकशीत सांगितले. यातील चौघेही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. त्यातील अराफत अली हा वकील अली खान याचा नातेवाईक आहे. वकिलाने यासाठी पैसे दिल्याचेही समोर आले आहे. यातील अन्सारी व अल्तमाश हे महिलेला प्रत्यक्ष मारहाण करण्यात सहभागी नव्हते. मात्र त्यांनी कटात सहभाग घेतला होता. त्यानंतर आता खान याला अटक करण्यात आली आहे.

असा घडला होता प्रकार
तक्रारदार महिला मॉर्निंग वॉकला जात असताना जितीन कुरीअन याने करणविरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घेतला नाहीतर अंगावर असिड फेकण्याची धमकी दिली होती. अशी तक्रार महिलेने पोलिसांत दिली होती. त्यानंतर हा कट रचणाऱ्या अली काशिफ खान वकिलाला शोधत आहेत.

Loading...
You might also like