तिच्यात आणि माझ्यात जे काही झालं ते दोघांच्या संमतीने : करण ओबरॉय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता आणि प्रसिद्ध फिटनेस मॉडेल करण ओबेरॉयला बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आता करणने त्याच्यावरील आरोप खोटे असून त्याच्यात व आरोप करणाऱ्या महिलेमध्ये जे काही झाले ते दोघांच्या संमतीने झाल्याचा दावा केला आहे. या बाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

करणचा जमीन अर्ज आज त्यासह वकील दिनेश तिवारी यांनी दिंडोशी न्यायालयात सादर केला. त्यात करणचे आणि महिलेचे मेसेजेसचे पुरावे सादर करण्यात आले. तसेच २० वर्षांपासून आपण इंडस्ट्रीत काम करीत असून त्याच्याविरोधात एकही गुन्हा नसून तो त्याच्या प्रेमळ व प्रामाणिक स्वभावासाठी ओळखला जातो, असे तिवारी यांनी न्यायालयात सांगितले आहे.

काय आहे प्रकरण ?
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता करणने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर बलात्कार केला. तसेच तिचा अश्लील व्हिडीओ तयार केली. या व्हिडीओवरून करण ओबेरॉय वारंवार तिला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. तसेच तिच्याकडून वारंवार पैशांची मागणी करीत होता. असे आरोप करण वर ठेवण्यात आले आहेत.

पूजा बेदीने केली करणची पाठराखण
या प्रकरणाबाबत बोलताना पूजा बेदी म्हणाली, ‘करणला मी चांगले ओळखते. तो अतिशय सज्जन, शालीन आणि दयाळू मुलगा आहे. तो असे काही करूच शकत नाही. त्यामुळे करणला नाही तर आरोप करणाऱ्या या महिलेला प्रश्न विचारायला हवेत. कारण तिचे आरोप पुर्णपणे अस्पष्ट आहेत, असे पूजा बेदी म्हणाली. अनेक महिला आपल्या अधिकारांचा चुकीचा वापर करत, पुरुषांवर खोटे आरोप लावतात. एखादी महिला पुरूषांवर खोटे आरोप लावत असेल तर तिला शिक्षा देण्यासाठी काय करता येईल ? असा सवालही तिने केला होता.

कोण आहे करण ओबेरॉय ?
करण ओबेरॉय हा ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या टीव्ही शोमुळे घराघरात पोहोचला होता. ‘‘इन्साइड एज’, ‘साया’ मध्ये देखील त्याने काम केले आहे. तसेच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मोना सिंह हिंचा तो माजी प्रियकर आहे. याबरोबरच बाईक्स तसेच काही कपड्यांच्या जाहिरातींमधून देखील तो झळकला आहे. २००१ मध्ये स्थापन झालेल्या ‘बँड ऑफ बोईज’ चा देखील तो सदस्य होता.