मुलाला भेटण्यासाठी घरातून पळून गेली होती ‘बेबो’; काय आहे हा किस्सा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   बिनधास्त आणि आपल्या अटींवर जगणारी बेबो म्हणजे करिना कपूर. सुमारे दोन दशकांपासून इंडस्ट्रीत आहे आणि काळासोबत ती अधिकाधिक प्रगल्भ झाली आहे. अलीकडे स्वत: करिनाने बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीत एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकल्यानंतर करिना किती खोडकर होती, याचा अंदाज तुम्हाला येईल. एकदा तर एका मुलाला भेटण्याच्या नादात बेबो अडचणीत आली होती. त्या मुलाला भेटण्यासाठी बेबो चक्क घरातुन पळून गेली होती.

हा नेमका किस्सा काय होता, हे सांगताना करीना म्हणाली की, लहानपणापासून माझी मोठी बहीण करिश्मा जे करायची, तेच मी करायचे. करिश्माला तिच्या मित्रांसोबत बाहेर जाण्याची परवानगी होती. पण मला मित्रांसोबत जाण्यास आईने मनाई केली होती. याचा मला खूप राग यायचा. मी १४-१५ वर्षांचे होते आणि त्यावेळी मला मनापासून एक मुलगा आवडला होता. आईला हे आवडले नव्हते. ती फोन तिच्या रूममध्ये लॉक करून ठेवायची. पण मला त्या मुलाला भेटायचे होते. आईने साहजिकच मला नकार दिला. मग आई डिनरला गेल्याची संधी साधली. मी चाकूने आईच्या रूमचे कुलूप तोडले आणि फोन घेऊन प्लान बनवला. प्लान बनवून मी घरातून पळून गेले. आईला जेव्हा हे कळले,तेव्हा तिने माझे काहीही ऐकले नाही. यानंतर मला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले गेले. घरातून पळून जाणे चूक होते, हे आत्ता कळते. पण तेव्हा मला फक्त त्या मुलाला भेटायचे होते आणि दुसरा कोणताही विचार त्यावेळी माझ्या मनात नव्हता. करिनाला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा आईचा निर्णय किती योग्य होता, हे आता खुद्द बेबोही मान्य करेल. करिना लवकरच दुस-यांदा आई बनणार आहे. सध्या ती तिची प्रेग्नंसी एन्जॉय करतेय.