पती सैफ, सलमान-शाहरूख-आमिर ची ‘नव्हे’ तर करिना ‘या’ खानची आहे खूप मोठी ‘फॅन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस करीना कपूर आई झाल्यानंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये परतली आहे. गेल्या वर्षीच तिचा सिनेमा वीरे दी वेडिंग रिलीज झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. तु्म्हाला सांगू इच्छितो की, करीना लवकरच अक्षय कुमारसोबत आगामी सिनेमा गुड न्यूज आणि इरफान खानसोबत अंग्रेजी मीडियममध्ये दिसणार आहे. लवकरच हे दोन्हीही सिनेमे रिलीज होणार आहेत.

तुम्हाला सांगू इच्छितो की, करीनाने करण जोहरचा मल्टिस्टारर सिनेमा तख्त देखील साईन केला आहे. सध्या ती प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. नुकतीच तिने अंग्रेजी मीडियमची शुटींग केली आहे. या सिनेमात तिने पहिल्यांदाच इरफान खान सोबत काम केले आहे. तिच्या या अनुभवाबाबत तिने भाष्य केले आहे.

इरफानबद्दल बोलताना करीना म्हणते की, “मी पानसिंग तोमर सोबतच इतरही त्यांचे सिनेमे पाहिले आहेत. मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. इरफानसोबत काम करून मी खूप उत्साही आहे. मी सलमान, आमिर, शाहरुख आणि सैफ अशा सर्वच खानसोबत स्क्रिन शेअर केली आहे परंतु मला इरफान सोबत काम करण्याची इच्छा होती. मला छोटासा जरी रोल मिळाला तरी मी त्यांच्यासोबत काम करायला तयार आहे.” आता तर ती इरफान सोबत लवकरच झळकणार आहे.