Kareena Kapoor | शेअर केलेल्या 108 सूर्यनमस्कारांच्या व्हिडीओमुळे करिना कपूर झाली ट्रोल

मुंबई : वृत्तसंस्था –   Kareena Kapoor | बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) तिच्या फिटनेसला (Fitness) घेऊन नेहमीच चर्चेत असते. दोन मुलांची आई असली तरी दोन्ही प्रेग्नेंसी (Pregnancy) नंतर तिने व्यायाम करून तिचा फिटनेस मेंटेन ठेवला आहे. त्यामुळे अनेक चाहते तिच्या फिटनेस शेड्यूलला फॉलो करतात. करिना सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिच्या व्यायामाचे फोटो आणि व्हिडिओ देखील सतत शेअर करत असते. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ तिचे चाहते हूबेहुब फॉलो करण्याचा प्रयत्न करतात.

 

करीना कपूरने एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये करिना सूर्यनमस्कार घालताना दिसत आहे.
या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी जोरदार कमेंट केल्या आहेत.
करीना कपूरने (Kareena Kapoor) तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
त्यामध्ये तिने काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली असून त्याच्यावर गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप घातला आहे.

 

परिधान केलेल्या ड्रेसमध्ये करिना सूर्यनमस्कार घालत आहे. या दरम्यान तिने 108 सूर्यनमस्कार (108 Suryanamaskar) घातले आहेत.
याबाबत तिने एक कॅप्शन देखील दिला आहे.
ज्यामध्ये तिने तिच्या योगा सेशनमध्ये 108 वेळा सूर्यनमस्कार घातल्याचे लिहिलं आहे.
तसेच या खाली तिने धन्यवाद, आता मी रात्री पम्किन पाय (Pumpkin Pie) खाऊ शकते, असं देखील लिहिलं आहे.
अर्थातच करिनाने खाण्यासोबत आपल्या शरीरावर देखील आपले लक्ष असले पाहिजे, असा संकेत दिला आहे.

करीनाने शेअर केलेला हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात पसंत आला आहे.
मात्र काही लोकांना तिने घातलेला सूर्यनमस्कार पसंत न आल्याने तिला धर्माच्या नावावर ट्रोल केलं जात आहे.
एका युजरने मुस्लीम मध्ये योगा करणं गुन्हा असल्याचं म्हटलं आहे. सोबतच बाहेर योगा नका करू नाहीतर मौलवी फतवा जारी करेल, असे देखील या कमेंट मध्ये लिहिलं आहे.
तर काहींनी तिच्या सूर्य नमस्कार घालण्याच्या पद्धतीलाच चुकीचं म्हटलं आहे.
तसेच 108 वेळा सूर्यनमस्कार घातल्यावर अनेकांनी सवाल देखील केले आहे.
करीना कपूर लवकरच आमिर खान (Amir Khan) सोबत ‘लालसिंग चढ्डा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटात दिसणार आहे.

 

Web Title : Kareena Kapoor | kareena kapoor did surya namaskar 108 times the video went viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nia Sharma | अबब..! चक्क टेबलवर उभं राहून नाचली ‘ही’ अभिनेत्री, पाहा व्हायरल Video

Crime News | आईवर प्रेम आणि मुलीसोबत अश्लिल चाळे; डबल गेम करणाऱ्या तरुणाला मायलेकींनी दिली शिक्षा

Parambir Singh | परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ? गोपनीय फाईल चोरल्याप्रकरणी निकटवर्तीयावर FIR