90 च्या दशकातील ‘हा’ स्टार होता करीना कपूरचा पहिला ‘क्रश’, 8 वेळा तिनं जाऊन पाहिलं त्याला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – करीना कपूर खान ही बॉलीवूडमधील नावाजलेली अभिनेत्री. बॉलीवूडच्या तीनही खान सोबत करीना कपूरने काम केलं आहे. करीनाने आपल्या करिअरची सुरुवात एका डान्स शो पासून केली होती आणि आता प्रत्येक मोठी प्रोडक्शन हाउसेस करीनासोबत सिनेमा करण्यासाठी वाट पाहून असतात.

नुकतीच करीना एका डान्स रिऍलिटी शोमध्ये जज म्हणून आली होती. यावेळी करीनाने आपल्या लहानपणीचा एक खुलासा केला आहे. करीनाने सांगितले की तीला राहुल रॉय हा अभिनेता खूप आवडायचा आणि राहुल हा तिचा पहिला क्रश होता तसेच आपण राहुलसाठी त्याचा आशिकी हा चित्रपट ८ वेळा पहिला आहे.

आशिकी हा चित्रपट १९९० च्या काळात प्रसिद्ध झाला होता. महेश भट्ट यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यावेळी चित्रपटातील सर्वच गाणी खूप प्रसिद्ध झाली होते. करीना कपूरने अभिनेता सैफ अली खान सोबत विवाह केला आणि सध्या ती बऱ्याच काळापासून आपला मुलगा तैमूर सोबत लंडनला राहत होती. मात्र एका डान्स रिऍलिटी शो मध्ये जज म्हणून आली असता करीनाने आपल्या पहिल्या क्रश बद्दल सांगतिले.

आरोग्यविषयक वृत्त –