‘बेबो’ करीनानं केला Instagram डेब्यू ? फोटोज व्हायरल

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलवूड स्टार करीना कपूर आपल्या लुक आणि अ‍ॅक्टींगमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करते. एवढी पॉप्युलॅरीटी असूनही अद्याप करीना इंस्टाग्रामवर ऑफिशियल पेज किंवा अकाऊंट नव्हतं. चाहते याच्या प्रतिक्षेत होते. परंतु आता असं दिसत आहे की, त्यांची प्रतिक्षा संपली आहे. कारण करीनानं इंस्टाग्राम डेब्यू केला आहे.

इंस्टावर अकाऊंट ओपन करताच करीनाच्या चाहत्यांनी तिला फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. करीनाचे लगेचच 43 हजार फॉलोवर्स झाले आहेत. अद्याप तिनं प्रोफाईल पिक्चरही ठेवण्यात आलेलं नाही. फक्त एक व्हिडीओ शेअर करण्यात आलं आहे ज्यात बेबोच्या येण्याची माहिती दिली आहे. चाहत्यांनीही तिचं स्वागत केलं आहे. व्हिडीओ शेअर करताना करीना म्हणाली होती, “कमिंग सून” एका मुलाखतीत बोलतानाच करीनानं आपल्या इंस्टा अकाऊंटविषयी माहिती दिली होती.

https://www.instagram.com/p/B9WLmUjF-7f/

याआधीही तिचं दरिअलकरीनाकपूर(therealkareenakapoor) नावानं एक फॅन पेज होतं. जे दुसरंच कोणीतरी मॅनेज करत होतं. यावर तिचे तब्बल 5.1 मिलियन्स फॉलोवर्स होते. करीनानं सांगितलं होतं की, लवकरच माझं ऑफिशयल पेज असेल. वेळ आल्यानंतर मी हे पेज तयार करेन. यावर माझ्या कामाचे अपडेट्स आणि काही पर्सनल गोष्टी असतील असंही तिनं सांगितलं होतं.

https://www.instagram.com/p/B9YKXXsFcrk/

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा सिनेमा 13 मार्च रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय ती ‘तख्त’ सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमाही आहे.
image.png

https://www.instagram.com/p/B8y49PsFtaO/

https://www.instagram.com/p/B8yMGkLlETZ/

https://www.instagram.com/p/B8yLvBiFUIm/

https://www.instagram.com/p/B8otu7Jl9IZ/

https://www.instagram.com/p/B8oWKEol9Fk/

https://aajtak.intoday.in/lite/story/kareena-kapoor-khan-instagram-debut-video-pictures-goes-viral-tmov-1-1169493.html?utm_source=atwap_home
image.png