तैमूरचा ‘सांभाळ’ आणि ‘काम’ यामध्ये अडकली अभिनेत्री करिना, करतेय असं ‘मॅनेज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर खान सध्या लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. मागील काही दिवसांपासून प्रत्येक आठवड्यात एका दिवसासाठी टिव्ही शूटिंगकरिता करिना भारतात ये-जा करत आहे. टिव्ही डेब्यू शो ‘डान्स इंडिया डान्स’ साठी दर गुरुवारी सकाळी भारतात येते आणि शूटिंग संपल्यावर रात्री लंडनला जाते. आत्तापर्यंत करिनाने दोन वेळा असे केले आहे.

View this post on Instagram

❤❤❤❤❤

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

करिनाचे पुढचे शेड्यूल खूपच व्यस्त आहे. यामुळे ती जास्तीत जास्त वेळ आपल्या परिवारासोबत घालवत आहे. यासाठी करिना आपले वर्क लाइफ आणि पर्सनल लाइफ बॅलन्स करुन चालत आहे.

करिना कपूर पती सैफ अली खान आणि मुलगा तैमुर अली खानसोबत जूनच्या पहिल्या आठवड्यातच इटलीमध्ये गेली होती. यानंतर ती लंडनला सुट्ट्या एन्जॉय करायला गेली. लंडनमध्ये सैफ अली खानसोबत आगामी चित्रपट जवानी जानेमन ची शूटिंग करत आहे.

काही दिवसांपुर्वी करिना आणि मोठी बहिण करिश्मा हे सगळे एका वेकेशनमध्ये सहभागी झाले होते. करिश्मा मुलांसोबत लंडन पोहचली होती. त्यांनी करिना, सैफ आणि तैमुरसोबत वेळ घालवला.

View this post on Instagram

#familylove💕

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

करिनाच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफला बॅलन्स करण्याच्या गोष्टीवर एक सांगितले. करिना कपूर नेहमी आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ चांगल्या प्रकारे सांभाळते. तिचे पुढचे शेड्यूल खूपच व्यस्त आहे. कारण तिच्याकडे ४ चित्रपट आहेत. करिना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल.  तिच्याकडे सध्या करण जोहरचा चित्रपट ‘तख्त’ आणि आमिर खानचा चित्रपट ‘लाल सिंग चढ्ढा’ आहे.

View this post on Instagram

#airportdiaries 👪💋

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘गुड न्यूज’ यावर्षी शेवटच्या महिन्यात प्रदर्शित होईल. या व्यतिरिक्त करिना १७ ब्रॅड्सला एंडोर्स करत आहे. भविष्यकाळात अनेक कॅम्पेन सुरु होणार आहे. याचे शूटिंग करिनाला करावे लागेल.

ब्रश केल्यानंतरही तोंडाची दुर्गंधी येते का ? ही असू शकतात कारणे

आश्चर्यच ! आता पोटातील गॅस बाहेर पडताच दुर्गंधी ऐवजी दरवळेल सुगंध

‘केस गळणे’ हा असू शकतो आजारपणाचा संकेत

वंचितला भाजपची ‘बी’ टीम म्हणणाऱे अशोक चव्हाण नरमले, ती टीका ‘राजकिय’

यांनी दिलाय अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा