Lakme Fashion Week 2020 : रॅम्प वॉक करणारी ‘बेबो’ करीना म्हणाली, ‘काश सैफ…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकार रॅम्प वॉक करताना दिसत आहेत. सध्या मुंबईत लॅक्मे फॅशन वीक सुरू आहे. अनेक अभिनेत्री या फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करत आपला जलवा दाखवत असतात. नुकतेच बेबो करीना कपूरनं आपले रॅम्प वॉकवाल्या लुकमधील काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.

करीनानं लॅक्मे फॅशन वीकमधील ग्रीन गाऊनमधील काही फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. करीनानं दिल्लीचे डिझायनर अमित अग्रवालसाठी रॅम्प वॉक केलं. यावेळी करीना खूपच कॉन्फिडेंट दिसून आली. यावर्षी फॅशन वीकला 20 वर्षे पूर्ण झाले आहेत. करीनानं एका संवादादरम्यान सांगितलं की, ती एक हिडन मॉडेल आहे. तिला रॅम्प वॉक करायला खूप आवडतं.

View this post on Instagram

❤️ @amitaggarwalofficial

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

यावेळी या फॅशन वीक दरम्यान करीना कपूरनं पती सैफ अली खानला खूप मिस केलं. ती असंही म्हणाली की, सैफनं इतं असायला हवं होतं आणि पहायला पाहिजे होतं की, मी किती सुंदर दिसत आहे.

या ग्रीन गाऊनमध्ये करीना खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. ऑफ शोल्डर डीप नेक असलेल्या या गाऊनमध्ये करीनाचं हॉट क्लीव्हेजही स्पष्ट दिसत आहे. सध्या करीनाचे हे ग्रीन गाऊनमधील फोटो सोशलवर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांनाही करीनाचे हे स्टनिंग फोटो खूपच आवडले आहेत.

 

You might also like