‘खान’ आणि ‘कपूर’ मध्ये कोणाला निवडणार करीना ? अभिनेत्रीनं दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हि सर्वात स्टायलिश अभिनेत्री समजली जाते. लाखो मुली तिची स्टाईल फॉलो करत असतात. मात्र करीना फक्त हृदयानेच नव्हे तर डोक्याने देखील फार हुशार आहे. याचा नमुना नुकताच एका कार्यक्रमात पाहायला मिळाला.

एका कार्यक्रमात तिला कपूर आणि खानमधील एकाला निवडायचे असेल तर कुणाला निवडशील ? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तिने दिलेल्या उत्तरामुळे प्रेक्षकांनी देखील कडकडून टाळ्या वाजवल्या. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या संचालकाने देखील तिचे चांगले कौतुक केले. यावेळी उत्तर देताना तिने म्हटले कि, मला कुणालाही निवडण्याची गरज नसून मी करीना कपूर खान असून मी दोन्ही असल्यामुळे मी स्वतःला नशीबवान समजते. त्यानंतर तिला आणखी एक मजेशीर प्रश्न विचारण्यात आला.

लिफ्टच्या प्रश्नावर करीनाचे उत्तर
तिला विचारण्यात आले कि, जर तू एका लिफ्टमध्ये आलिया भट्ट, दीपिका पादुकोण आणि कटरीना कैफ यांच्यासह अडकली तर काय करशील ? यावर उत्तर देताना तिने म्हटले कि, ती त्या ठिकाणी रणबीर नसल्याची पहिल्यांदा खात्री करून घेईल.

Visit : Policenama.com