‘या’ कारणामुळे करीनाने ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमाचे शुटींग पुढे ढकलले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर तिचा आगामी सिनेमा अंग्रेजी मीडियममधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती कॉपची भूमिका साकारणार आहे. पूर्वी अशी माहिती समोर आली होती की, लवकरच ती सिनेमाच्या शुटींगला सुरुवात करणार आहे.  परंतु आता असे समजत आहे  की, तिने तूर्तास या सिनेमाच्या शुटींगला स्थिगिती दिली आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, गुडन्यूज हा सिनेमा आणि मॅगझीन च्या फोटोशुटमध्ये बीजी असल्या कारणाने करीना तिचा मुलगा तैमूर याला अजिबात वेळ  देऊ शकली नाही. त्यामुळे तिने सिनेमाचे शुटींग पुढे ढकलले. त्यामुळे करीना आता मे ऐवजी जूनमध्ये सिनेमाचे शुटींग सुरु करणार आहे. तिला सध्या तैमूर सोबत वेळ घालवायचा आहे. तैमूरच्या प्लेग्रुपच्या सुट्ट्या मे पासून सुरु होणार आहे. एकदा का तैमूरच्या सुट्ट्या सुरु झाल्या मग करीना जूनमध्ये अंग्रेजी मीडियमच्या शुटींगला सुरुवात करणार आहे. यावेळी ती तैमूरला घेऊन लंडनला जाण्याची शक्यता आहे. करीना तैमूर सोबत आपला पूर्ण वेळ घालवत असते. तैमूर नेहमीच तिच्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी राहिला आहे.

करीनाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, करीना आणि इरफान अंग्रेजी मीडियमच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. मिस्टर चंपक या भूमिकेत इरफान खान दिसणार आहे. ही भूमिका एका  मिठाईच्या दुकानाच्या मालकाची आहे. करीना एका पोलिसाच्या भूमिकेत या सिनेमात दिसणार आहे. होमी अदजानिया या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.