लंडनमध्ये करिना, करिष्मा आणि सैफ अली खानची ‘धमाल’ पार्टी, ‘लहानगा’ तैमूर ‘गायब’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपुर्वीच अभिनेत्री करिना कपूर, सैफ अली खान व तैमुर लंडनला गेले होते. तिघेही तिथे सुट्ट्या एन्जॉय करत होते. आता लंडनमध्ये करिनाची बहिण करिश्मा कपूर ही तिच्या दोन मुलांना घेऊन त्यांच्यामध्ये सहभागी झाली आहे. या सगळ्यांनी मिळून तेथील पार्कमध्ये पार्टी एन्जॉय केली आहे. यांच्या लंडन पार्टीचे काही फोटो समोर आले आहेत.

या फोटोमध्ये करिना, सैफ आणि करिश्मा पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे पण नेहमी यांच्यासोबत असणारा स्टारकिड्स तैमूर दिसत नाहीये. ज्या क्लबमध्ये करिना, सैफ आणि करिश्मा पार्टी करताना दिसत आहे तो क्लब लंडनचा सगळ्यात महाग आणि खास क्लब आहे. करिना आणि करिश्माने या पार्टीमध्ये ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला दिसत आहे व सैफ फॉरमल शर्ट अटायरमध्ये स्मार्ट दिसत आहे.

View this post on Instagram

#londondiaries with Family ❤❤❤ @therealkarismakapoor

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

फोटोमध्ये करिश्माने रेड कलरची लिपस्टिक लावली आहे त्याचबरोबर करिना न्यूड ग्लोसी लिप्समध्ये दिसत आहे. दोघीनींही ब्लॅक सीक्कीन ब्लेजर घातला आहे. त्यांचा हा फोटो करिश्माने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

View this post on Instagram

Twinning once again 💙 #balmain #black #sisters #aboutlastnight

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

त्याचबरोबर त्यांचा आणखी एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये करिना, सैफ आणि करिश्मा डिजाइनर मयूर गिरोत्रासोबत एका पार्कमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये सगळे कॅज्युअल लुकमध्ये दिसत आहे.

सध्या अभिनेता सैफ अली खानने ‘जवानी जानेमन’ चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. यामध्ये त्याच्यासोबत पूजा बेदीची मुलगी आलिया फर्नीचरवाला, तब्बू आणि कूबरा सेठ दिसणार आहे त्याचबरोबर अभिनेत्री करिना कपूर लवकरच इरफान खान यांचा चित्रपट ‘अंग्रेजी मीडियम’ च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त

सावधान ! मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकतो ‘ब्रेन कँन्सर’

रोग प्रतिकारशक्ती दुबळी का होते ? जाणून घ्या

नंबर वाढला तर चष्म्याची लेन्स नियंत्रित करा, बदलण्याची गरज नाही

या खाद्यपदार्थांच्या सेवनाने तुम्ही दिवसभर राहू शकता आनंदी

You might also like