सोनम कपूरच्या बहिणीला ‘बेबो’ करीनानं दिला भोपळ्याचं सुप पिण्याचा सल्ला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस करीना कपूर सिनमांसोबतच आपल्या फिटनेसमुळंही चर्चेत असते. मोठी मेहनत घेत करीना स्टार्ससोबत चाहत्यांनाही प्रेरणा देत असते. तिची न्युट्रशनिस्ट रुजुता दिवेकर हिनं सांगितलं आहे की, करीना आपल्या डाएटमध्ये घरातील पदार्थच जास्त खाते. यात डाळ, बाजरीची भाकरी, मेथीची भाजी यांचा समावेश असतो. एका इंस्टा स्टोरीमुळं करीना चर्चेत आली आहे.

बॉलिवूड स्टार सोनम कपूरची बहिण रिया कपूर हिनं अलीकडेच एक स्टोरी तिच्या इंस्टावरून शेअर केली आहे. तिनं लिहिलं की, कोरोना व्हायरसमुळं घरातच वेळ घालवावा लागत आहे. ही आरोग्य आणि फिटनेसवर लक्ष देण्याची वेळ आहे. पालक सूप कायमस्वरूपी.” तिनं या स्टोरीत करीना कपूरला टॅग केलं आहे. करीनानंदेखील ही स्टोरी शेअर म्हटलं की, भोपळ्याच्या सुपाचाही समावेश करायला हवा.”

करीनाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्याचं दिसत आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या या स्टोरीवर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. काहींनी तिचं या फिटनेस टीपबद्दल कौतुकही केलं आहे.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय ती तख्त सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे.