करिना घेणार ‘या’ अभिनेत्रीची मुलाखत?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

नेहमीच नवनवीन प्रयोग करण्यात बॉलिवुड सेलिब्रिटी मशगुल असतात. असेच नवीन कामात मशगुल झालीये, पतौडीची सुन करिना कपुर – खान. करिना लवकरच तिचा स्वत:चा रेडिओ चॅट शो घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यात करिना कपूर खान चक्क आर.जे. म्हणजेच रेडिओ जॉकीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या पहिल्या वहिल्या चॅट शोच्या पहिल्याच भागात सेलिब्रेटी गेस्ट कोण असेल याबद्दल बरेच तर्क वितर्क लावण्यात आले होते.

आता या चर्चा सत्राला पूर्णविराम मिळाला आहे. कारण, पहिल्या चॅट शोसाठी करिनानं चक्क सनी लिओनीला आमंत्रित केलं आहे. नुकतंच करिनानं आपल्या पहिल्या रेडिओ चॅट शोचं चित्रिकरण पार पाडलं. यापूर्वी सनी आणि करिना कधीही एकत्र काम केलेले नाही. त्यामुळे या दोन्ही महिला कलाकारांची बॉन्डींग चाहत्यांसाठी अनुभवायला मिळणार आहे हे नक्की.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’55e02790-c300-11e8-979b-6b717e275bea’]

करिना कपूर आणि सनीचा चॅट शोमधला फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातूनही करिना कपूर आर.जेची जबाबदारी कशी पार पडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. करिनाचा रेडिओ शो येत्या डिसेंबरपासून येणार असल्याचे समजते. सध्या निर्माता दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’, ‘कॉलिंग करण’, नेहा धुपियाचा ‘नो फिल्टर नेहा’ हे चॅट शोही तरुणाईमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत त्यामुळे करिनाच्या चॅट शोमध्ये काय नवं पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेषकांना असेल.

[amazon_link asins=’B01G1NRRTG,B079RKP9LW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9cab701d-c2ff-11e8-b786-47aa8c60c5b2′]