Photos : प्रेग्नंट ‘बेबो’ करीनानं केली योगासनं, शेअर केले खास फोटो !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार करीना कपूर (Kareena Kapoor) आणि तिचा पती अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या घरी आता नवा पाहुण येणार आहे. सैफ आणि करीना दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत. लवकरच तैमूर अली खानला (Taimur Ali Khan) भावंड मिळणार आहे. सध्या करीना तिचा प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत आहे. या काळात ती सोशलवर अ‍ॅक्टीव्ह दिसत आहे. करीना तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता तिनं प्रेग्नंसीमध्ये योगा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या चर्चेत आहेत.

करीनानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती काही योगा पोज करताना दिसत आहे. हे फोटो तिचे प्रमोशनल फोटोशुट दरम्यानचे आहेत. यात करीना ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. फोटोत करीना वेगवेगळ्या योगा पोज करताना दिसत आहे.

काही फोटोत करीना पिंक वर्कआऊट आउटफिटमध्ये दिसत आहे. योगा करतानाच ती आपलं बेबी बंप फ्लाँट करतानाही दिसत आहे.

करीनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी हे फोटो शेअरही केले आहेत. काहींना तिचा लुक आणि फिटनेस आवडला आहे.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं अंग्रेजी मीडियम सिनेमात काम केलं आहे. हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज झाला होता. लवकरच ती करण जोहरच्या तख्त या मल्टीस्टारर सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे. या सिनेमात ती आमिर खानसोबत काम करणार आहे. पुढील वर्षी ख्रिसमसला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

https://www.instagram.com/p/CKdbFFylXTg/

https://www.instagram.com/p/CKdUb1XFagp/