‘बेबो’ची ‘या’ लोकांशी केली तुलना, करिनानं दिलं सडेतोड उत्तर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर सध्या आपला आगामी सिनेमा गुड न्यूज या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात तिच्या सोबत अक्षय कुमार, कियारा आडवाणी, दिलजीत दोसांझ हे कलाकारही दिसणार आहेत. सध्या सर्व कलाकार सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. करिना नुकतीच म्हणाली आहे की, युवा पिढीसोबत तिची तुलना करणं चुकीचं आहे. एका मुलाखतीत ती बोलत होती.

View this post on Instagram

👓 From @imageeyewear ❤️

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

करिनाचं लग्न झालं आहे. तिला एक मुलगा आहे असं असतानाही तिची तुलना युवा पिढीसोबत केल्यानंतर करिना म्हणाली, “मी आताही काम करत आहे तरीही माझी तुलना युवा पिढीशी केली जात आहे. असं पाहून मला आश्चर्य वाटत आहे. ते असं का करतात कळत नाही, मी तर या पिढीचा भाग नाही. आणि या शर्यतीचा तर नाहीच नाही. तरीही लोक आजच्या पिढीतील कोणासोबत तरी माझी तुलना करत असतात. मी म्हणते असं का ?” करिना सांगते की ती नेहमीच काहीतरी नवीन शोधण्याचा आणि नवीन करण्याचा प्रयत्न करत असते.

करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिचा गुड न्यूज हा आगामी सिनेमा 27 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. 2000 मध्ये आलेल्या रेफ्युजी या सिनेमातून करिनानं करिअरला सुरुवात केली होती. करिनाला इंडस्ट्रीत जवळपास 20 वर्षे होत आली आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

You might also like