Ex बॉयफ्रेंड शाहिद आणि पती सैफसोबत एकाच लिफ्टमध्ये अडकलीस तर काय करशील ? ‘बेबो’ करीना म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार करीना कपूर आणि शाहिद कपूर कधी काळी नात्यात होते. आता तिनं सैफ अली खानसोब लग्न केलं आहे. करीना एकदा करण जोहरच्या कॉफी विद करण या शोमध्ये आली होती. यावेळी तिं जो काही बिंधास्तपणा दाखवला तो पाहून सारेच अवाक् झाले. करणनं तिला सैफ आणि शाहिदबद्दल एक प्रश्न विचारला ज्यावर तिनं खूप शानदार उत्तर दिलं.

कॉफी विद करणमध्ये करीना पती सैफ अली खानसोबत आली होती. हा एपिसोड 2016 मध्ये रिलीज झाला होता. करणनं तिला विचारलं की, जर तू पती सैफ अली खान आणि शाहिद कपूरसोबत एकाच लिफ्टमध्ये अकडलीस तर तुझी काय प्रतिक्रिया असेल. यावर उत्तर देताना करीना म्हणाली, “हे खूप अमेजिंग असेल. त्या दोघांनी रंगून सिनेमात एकत्र काम करत आहेत. मला नाही आवडलं की, मी रंगूनमध्ये हिरोईन नव्हते.” करीनाचं उत्तर ऐकून सैफ आणि करण दोघंही हैराण झाले.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज झाला आहे. कोरोनामुळं सध्या सारं काही ठप्प झालं आहे. त्यामुळं काही दिवसांनंतर हा सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे असं सांगण्यात येत आहे. याशिवाय ती तख्त सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे.