सैफ अली खानच्या मिशांशी खेळताना दिसली करीना, सोशलवर झाली ट्रोलची शिकार 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी 2012 मध्ये लग्न केलं. त्यानंतर हे दोघे नेहमीच चर्चेत असतात. दोघे जरी सोशल मीडियावर जास्त ॲक्टीव्ह नसले तरी त्यांचे फोटो अनेकदा समोर येत असतात. त्यात अनेकदा दोघांची स्ट्राँग बाँडिंग दिसून येते. अशातच त्यांचा आणखी एक फोटो समोर आला असून तो व्हायरल होताना दिसत आहे.

या फोटोत करीनाने ब्लॅक टॉप आणि ब्लू जिन्स घातली आहे. सैफने पिंक टीशर्ट आणि ब्लू जिन्स घातली आहे. दोघांचा हा फोटो खूपच क्युट आहे. परंतु या फोटोवरून सोशलवर करीनाला खूपच ट्रोल करण्यात आले आहे.

अनेकांनी या फोटोवर कमेंट करून करीना ट्रोल केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, करीनाचे हात खूपच जाड झाले आहेत. तिला त्यांच्यावर काम करायला हवं. काहींनी तर पुन्हा एकदा त्यांच्या वयावरून खिल्ली उडवली आहे.

View this post on Instagram

#kareenakapoorkhan #saifalikhan at #rutujadiwekar

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

तु्म्हाला सांगू इच्छितो की, करीना आणि सैफचा हा फोटो रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणची आठवण करून देतो. असाच रणवीर आणि दीपिकाचा एक फोटो समोर आला होता. त्यात दीपिका रणवीरच्या मिशा कापताना दिसून आली होती.

वर्कफ्रंट बद्दल सांगायचे झाले तर, करीना कपूर अंग्रेजी मीडियम आणि गुड न्यूज या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता इरफान खान सोबत ती दिसणार आहे.

Loading...
You might also like