महागडा मास्क वापरते Kareena Kapoor, रंगलीय चर्चा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सर्वत्रच कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाचे दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव पाहून सध्या प्रत्येकजण कोरोनापासून बचावासाठी घेता येईल तितकी खबरदारी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. बाहेर पडताना मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचेही पालन करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांना कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या अधिक आहे. अक्षय कुमार, विकी कौशल, भूमी पेडणेकर, आलिया भट्ट हे त्यापैकीच काही. कोविडच्या नियमांचे योग्य पालन करावे असे सेलिब्रेटी चाहत्यांना आवाहन करत आहेत.

नुकतीच अभिनेत्री करीना कपूर खाननेही चाहत्यांना कोरोनासदर्भात एक आवाहन केले आहे. पण यात तिचा मास्कच जास्त चर्चेत आला आहे. दिसायला हा मास्क अगदी साधा वाटत असला तरी त्याची किंमत मात्र हजारांमध्ये आहे. छोटे नवाब सैफची बेगम होण्याआधीपासूनच करीना आपली फॅशन आणि स्टाईलबाबत बरीच सजग आहे. ती कुठल्याही कार्यक्रमात जाते तिथे आपल्या हटके फॅशन आणि स्टाईलने साऱ्यांच्याच नजरा आकर्षित करून घेते. रिल लाईफ असो किंवा रिअल बेबोच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात. सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असणारी करीना कपूर खान तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

करिनाने मास्क लावलेला एक फोटो शेअर केला आहे. काळ्या रंगाचा मास्क लावलेला करिनाचा फोटो सा-यांचे आकर्षण ठरला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की – हा कोणता प्रोपोगंडा नाही फक्त मास्क लावण्याचे आवाहन करत आहे. तुर्तास करिनानने लावलेला काळ्या रंगाचा मास्कची किंमत $355 डॉलर्स भारतीय चलनानुसार 25, 994 रुपये इतकी आहे. हा मास्क विविध शॉपिंग वेबसाईटवर उपलब्ध आहे. दुसर्‍या मुलाच्या जन्मानंतर महिनाभरातच करिना कपूर कामावर परतली. तेव्हापासून अनेकदा करिना बाहेर पडताना दिसली. यादरम्यानचे तिचे फोटो व व्हिडीओही व्हायरल झालेत. पण बेबोचा ताजा व्हिडीओ पाहून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. होय, बेबोचा अ‍ॅटिट्यूड पाहून लोकांची अशी काही सटकली की, “बस करो भाई, क्यों इतनी इज्जत दे रहे हो?” अशा प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या आहेत.