‘बेबो’ करीनाने अ‍ॅक्सेप्ट केलं ‘खिलाडी’ अक्षयचं ‘बाला चॅलेंज’ ! (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा हाऊसफुल 4 सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी तयार आहे. या सिनेमात अक्षय व्यतिरीक्त बॉबी देवोल, रितेश देशमुख, पूजा हेगडे, कृती सेनन, कृती खरबंदा मु्ख्य भूमिकेत आहेत. नुकतंच या सिनेमातील गाणं शैतान का साला रिलीज झालं ज्याची खूप चर्चा झाली. या गाण्यावरून अक्षयने आपल्या चाहत्यांना बाला चॅलेंज दिलं आणि व्हिडीओ बनवून अपलोड करण्यासाठी सांगितलं होतं. करीना कपूर, दिलजीत दोसांझ, कियारा आडवाणी यांनी हे चॅलेंज पूर्ण केलं आहे. याचं व्हिडीओ अक्षय कुमारने इंस्टावर शेअर केलं आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, चारही स्टार्स शैतान का साला गाण्याच्या सिग्नेचर स्टेप्स करताना दिसत आहेत. या पोस्टसोबत त्याने गुड न्यूज सिनेमाच्या रिलीजबाबतही खुलासा केला आहे. हा सिनेमा 27 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. चारही स्टार्स गुड न्यूज सिनेमात दिसणार आहेत.

अक्षयचा हाऊसफुल 4 हा सिनेमा 26 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. फरहाद सामजीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. साजिद खानवर आधी सिनेमाच्या डायरेक्शनची जबाबदारी होती परंतु मीटू मध्ये त्यांचं नाव आल्याने ते प्रोजेक्टमधून बाहेर पडले.

90 ऐवजी 65 दिवसांत शुटींग पूर्ण
रिपोर्टनुसार, हाऊसफुल 4 शुट करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी ठरवण्यात आला होता. परंतु अक्षय कुमारची ओढ आणि वेळेचं बंधन यामुळे सिनेमाची शुटींग 65 दिवसांतच पूर्ण झाली. हाऊसफुलच्या सर्वच पार्टला चांगलं यश मिळालं आहे.

visit : policenama.com