नेपोटिझमवर करीना कपूरचं मोठं विधान, म्हणाली – ‘आमचे चित्रपट बघायला जाऊ नका’ ! आता होतेय ट्रोल

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आपल्या ताज्या मुलाखतीमुळे ट्विटर वापरकर्त्यांच्या निशाण्यावर आली आहे. एका वाहिनीवर बोलताना करीनाने बॉलिवूडमधील नेपोटीझमबाबत चर्चा केली. यावेळी करिना कपूर म्हणाली की, जनतेनेच नेपोटीझम बनवले आहे. आपण स्टार किड्सचे चित्रपट पाहायला जात आहात, त्यामुळे ते प्रसिद्ध होत आहेत. जाऊ नका. हे चित्रपट पहाण्यासाठी कोणीही तुमच्यावर दबाव आणत नाही. दरम्यान, या विधानामुळे करीना कपूर खान ट्विटरवर ट्रेंड करत आहे. काही लोकांना ती काय बोलली याची कल्पना नसली तरी, तिला भयंकर ट्रोल करत आहेत. लोकांचा राग आहे की, करीनाने असे बोलायला नको होते.

तसेच, आता काही जण म्हणत आहेत की, ते करीनाचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट पाहणार नाहीत. काही वापरकर्त्यांनी करिनाच्या विधानाबाबत सांगितले की, तिचा चित्रपटाचा प्रचार करण्याचा हा मार्ग आहे. असे नाही की प्रत्येकजण करिना कपूर खानला वाईट म्हणत आहे. मिम्ससुद्धा तिच्या नावाने मजा करायला मागे राहिले नाहीत. दरम्यान तिच्या समर्थनार्थ फार कमी वापरकर्ते बाहेर आले आहेत.

दरम्यान, करीना कपूर खान आणि आमिर खान स्टारर फिल्म लालसिंग चड्ढा आता 2020 च्या ख्रिसमस ऐवजी 2021 च्या ख्रिसमसवर रिलीज होणार असल्याची घोषणा सोमवारी करण्यात आली आहे. हा हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्सचा लोकप्रिय फॉरेस्ट गंपचा रिमेक आहे. या चित्रपटात आमिर खान सरदारच्या भूमिकेत दिसणार आहे. अद्वैत चंदन हे दिग्दर्शन करीत आहेत.