kareena aunty : त्यानं ‘आंटी’ म्हटल्यानं करिना संतापली

मुंबई : वृत्तसंस्था – करीना कपूरचे नाव सध्या आघाडीच्या अभिनेत्रींन मध्ये घेतलं जात. आपण फिट दिसावं यासाठी करीना प्रचंड मेहनत घेते. जिम मध्ये तासनतास घाम गाळताना दिसते. अशातच जर तिला कोणी ‘आंटी’ म्हटल तर करीना नक्कीच नाराज होईल नाही का ? असाच एक किस्सा नुकताच घडला आहे. सोशल मीडियावर एका चाहत्याने करिनाला ‘आंटी’ म्हटल्यानं ती खूप नाराज झाली असून त्याच्यावर चांगलीच संतापलेली दिसली.

अरबाज खानचा आगामी वेब सीरिज शो ‘पिंच’ मध्ये करिना कपूर दिसणार आहे. या शोचा प्रोमो नुकताच यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. या शोमध्ये करिना कपूर सोशल मीडियावर स्वतःला ट्रोल केल्यानंतर प्रत्युत्तर देताना दिसत आहे. शोमध्ये सोशल मीडियावर एका चाहत्याने करिनाला ‘आंटी’ म्हटल आहे. त्यावर करीना प्रचंड संतापली.

या शो मध्ये करिना कपूर तिच्यासंबंधी आलेली एक कमेंट वाचताना दिसतेय. या चाहत्याने करिनाला उद्देशून एक कमेंट लिहिली होती. ‘आता तू एक ‘आंटी’ आहेस… एका तरूणीची भूमिका करणं बंद कर’, असं या चाहत्यानं म्हटलं होतं. चाहत्यानं ‘आंटी’ म्हटल्यानं करिनानं चाहत्याला चांगलेच खडसावले. प्रसिद्ध व्यक्ती, अभिनेते, अभिनेत्री यांच्यात कोणतीही भावना नसते. आम्हाला अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करावं लागेल, असं करिना यावर म्हणाली.

‘पिंच बाय अरबाज खान’ या वेब सीरिज मध्ये करिना कपूरसह सोनाक्षी सिन्हा, करण जोहर, सोनम कपूर, सनी लिओनी आणि कपिल शर्मा अरबाज खानसोबत चर्चा करताना दिसणार आहे. लवकरच करीना कपूर अक्षय कुमार सोबत आगामी ‘गुड न्यूज’ या चित्रपटात झळकणार आहे. सध्या ती याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

ट्रीटमेंट नंतर इरफान भारतात परतला, पहा त्याची पहिली झलक

साराचा १४ वर्षांपूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

अरबाजच्या ‘त्या’ प्रश्नावर सनी लिओनी रडू लागली