‘ही’ टॉपची अभिनेत्री आता खलनायिकेची भूमिका करण्यास तयार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – करीना कपूरला हिंदी फिल्म इंडस्ट्रीत 20 वर्ष पूर्ण करण्यासाठी एकच वर्ष बाकी आहे. असे वाटत आहे की, ती आता निगेटीव्ह रोलसाठी तयार आहे. करीनाने आपल्या करिअरमध्ये निगेटीव्ह रोल फिदा (2004) सिनेमात साकारला होता. या सिनेमात करीनाने कॅमिओ केला होता.

करीना एक अशी महिला बनली होती जी एका माणसाला त्याच्या प्रेयसीच्या चुकीची शिक्षा देते. या सिनेमात तिच्यासोबत शाहिद कपूर आणि फरदीन खान होते. करीनाचा हिरोईन हा सिनेमाही निगेटीव रोलचं चांगलं उदाहरण आहे.

लॅक्मे फॅशन वीक 2019 मध्ये एका वृत्तसंस्थेशी बोलताना करीना म्हणाली की, “रोल जर चांगला असेल तर मला निगेटीव रोल करायलाही आवडेल. मलाही निगेटीव रोल करायचा आहे.”

https://www.instagram.com/p/B1mEpl-lhyP/?utm_source=ig_embed

आपला अपकमिंग सिनेमा गुडन्यूजबद्दल सांगताना करीना म्हणाली की, “हा सिनेमा एंटरटेनिंग आहे. यात खूप फन आणि एक्साईटमेंट असेल. कारण हा सिनेमा ख्रिसमसला रिलीज होत आहे. याची कॉन्सेप्ट एकदम वेगळी आहे. सुट्टीत हा सिनेमा रिलीज होत आहे. तु्म्ही हा सिनेमा पाहून खूप हसाल.”

https://www.instagram.com/p/B1mEu2flFE5/

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ती इम्रान खानच्या अंग्रेजी मीडियम सिनेमात काम करत आहे. 2017 साली आलेल्या हिंदी मीडियम या सिनेमाचा हा सिक्वल आहे. गुडन्यूज सिनेमाबद्दल सांगायचे झाले तर ही अशा एका कपलची गोष्ट आहे जे प्रेग्नंट होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या सिनेमात करीना सोबत अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी दिसणार आहे. हा सिनेमा 27 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

https://www.instagram.com/p/B1mD6s4lOX-/

https://www.instagram.com/p/B1l3l5xFPC8/

https://www.instagram.com/p/B1f_ih8l9U1/

आरोग्यविषयक वृत्त –