… म्हणून रिफ्युजीमध्ये अभिषेक बच्चनसोबत ‘तो’ सीन नव्हता करायचा करिना कपूरला

पोलीसनामा ऑनलाइन टीम – १९ वर्षा आधी ‘रिफ्युजी’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली होती. त्या वर्षांतील पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. सन २००० मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अभिषेक व करिनाचा पहिला चित्रपट होता. आता या चित्रपटाबद्दलची एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे.   

image.png

करिना कपूर या चित्रपटात अभिषेक सोबत रोमँटिक सीन करताना खूप नर्वस झाली होती. चित्रपट पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल कि चित्रपटाचा पहिलाच सीन रोमँटिक आहे. करिना अभिषेकला भावासारखा मानत असल्याने ती हा सीन करण्यास राजी नव्हती.

image.png

दिग्दर्शक जेपी दत्ता यांना या दरम्यान करिना म्हणाली होती की, ‘जेपी अंकल मी अभिषेकसोबत रोमॅन्टिक सीन कसा करू शकते. तो माझ्या भावासारखा आहे’. याबद्दलचा खुलास अभिषेकने एका टॉक शोमध्ये केला होता. पुढे त्याने सांगितले की, शूटींगच्या पहिल्या दिवशी सेटवर करिनाचा आत्मविश्वास कमालीचा होता. करिना अभिषेकला पहिल्याच दिवशी म्हणाली होती की, ‘एकदिवस मी देशाची नंबर वन स्टार असेन’. तिचा तो आत्मविश्वास बघून मी अवाक झालो होतो,’ असे अभिषेकने यावेळी सांगितले होते.

image.png

‘कहो ना प्यार है’ची ऑफर सर्वप्रथम राकेश रोशन यांनी करिनाला दिली होती. करिनाने हा चित्रपट साइन करून ऐनवेळी तिने हा चित्रपट सोडला होता. त्याच दरम्यान ‘रिफ्युजी’साठी जेपी दत्ता यांना एक नव्या चेहऱ्याचा शोध होता. करिनाला जेपीने पहिल्यांदा पहिले आणि आपल्या चित्रपटासाठी परफेक्ट अभिनेत्री वाटल्याने तीची निवड केली. त्यावेळी करिना १९ वर्षाची होती तर अभिषेक २४ वर्षाचा होता.

image.png

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी