Kareena Kapoor | ‘तू मुलाला विकू शकत नाही’; तैमूरसाठी सैफ अली खानला असं काय बोलली करिना कपूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा मुलगा तैमुर (Taimur) हा सर्वात जास्त लोकप्रिय स्टारकिड आहे. चार वर्षाच्या तैमुरचे फोटो सोशल मीडियात लगेच व्हायरल होत असतात. तैमुरच्या स्टारडम मुळे त्याला चित्रपटाच्या प्रमोशनला (Movie promotion) बोलवणाच्या सल्ला अनेक निर्मात्यांनी सैफला दिला होता. यासंदर्भात एका मुलाखतीत बोलताना सैफने सांगितले की, याला करीनाने (Kareena Kapoor) तीव्र विरोध केला.

तू माझ्या मुलाला विकू शकत नाही
सैफ अली खानने 2018 मध्ये ही मुलाखत सिद्धार्थ कनन (Siddhartha Kanan) याला दिली होती. यावेळी सैफने सांगितले की, मी ज्या ज्या निर्मात्यांसोबत काम केलंय, त्या प्रत्येक निर्मात्याने तैमुरला प्रमोशनसाठी बोलवण्याचा सल्ला दिला होता. ‘कालाकांडी हंटर’च्या (Kaalakaandi) निर्मात्यांनी तर एक भन्नाट कल्पना सुचवली होती. परंतु करीना त्यावेळी माझ्यावर खूप भडकली. तू माझ्या मुलाला विकू शकत नाही, असं ती म्हणाली. तैमुरसाठी जर चांगल्या जाहिरातीची ऑफर आली तर त्याचा विचार करु असं मी करीनाला म्हणलो. परंतु तिचा याला पूर्णपणे विरोध होता, असे सैफने सांगितले.

 

दुसऱ्या मुलाला माध्यमांपासून दूर ठेवलं

सैफ आणि करीनाचा मुलगा तैमुर याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असताना दुसरीकडे त्यांचा दुसरा मुलगा ‘जे’ (Jeh) याला मात्र माध्यमांपासून दूर ठेवणं करीनानं पसंत केलं आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला करीनाने एका मुलाला जन्म दिला आहे.
परंतु करीना सोशल मीडियावर पोस्ट करताना त्याचा चेहरा मात्र दाखवत नाही.
करीनाने तिच्या गरोदरपणातील अनुभवावर ‘प्रेग्नसी बायबल’ हे पुस्तक लिहलं असून त्याचे नुकतेच प्रकाशन झाले आहे.

Web Title :- Kareena Kapoor | you can not sell your son said kareena kapoor to saif ali khan for his idea to sell taimur for nappy ads

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Healthy Diet | मान्सूनमध्ये तळलेल्या-भाजलेल्या पदार्थांनी होईल नुकसान,
आजारांपासून बचावासाठी ‘या’ 7 गोष्टींचे करा सेवन; जाणून घ्या

Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्री म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा’; अनेकांच्या भुवया उंचावल्या (व्हिडीओ)

BJP MLA Atul Bhatkhalkar | ‘मुंबईत पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत’, भाजपचा हल्लाबोल