करीना कपूरने घेतला वेगळे होण्याचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेली १० वर्षे ते एकत्र होते. एकत्र काम करीत होते. पण आता त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. करीना कपूर हिने एकमेकांच्या सहमतीने वेगळे होण्याचे ठरविले आहे. थांबा तुमच्या मनात आहे तसे काहीही नाही. करीना आणि सैफ यांचे व्यवस्थित चालले आहे. करीनाची व्यवस्थापक पूनम दमानिया हिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय त्या दोघींनी घेतला आहे.

सेलिब्रेटी आणि त्यांचे व्यवस्थापक यांच्यातील संबंध मित्र, भाऊबहिणीसारखेच असतात. व्यवस्थापक केवळ कलाकारांची महत्वाची कामेच हाताळत नाहीत तर कधी कधी त्यांना स्टार बनविण्याचे कामही करतात. अभिनेते आणि अभिनेत्री जितके लोकप्रिय त्यांच्यापेक्षा अधिक काम त्यांच्या व्यवस्थापकांना करावे लागते.

पूनम गेली १० वर्षे करीना कपूरची मॅनेजर होती. परंतु, आता त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचे ठरविले आहे. पूनम ही करीना कपूर सोबत रेश्मा शेट्टीची टॅलेट मॅनेजमेंट कंपनी मॅट्रिक्स अंतर्गत जोडली गेली होती. मात्र आता ती या कंपनीपासून वेगळी झाली आहे. पूनमही स्वत:ची टॅलेट मॅनेजमेंट कंपनी उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या वेगळ्या झाल्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like