अभिनेत्री करिनाचा ‘अंग्रेजी मीडियम’ लुक ! नेटकर्‍यांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा अभिनेता इरफान खान नुकताच कॅन्सरवर मात करून भारतात पोहचला आहे. आपल्या चाहत्यांवर पुन्हा छाप टाकण्यासाठी इरफान आगामी चित्रपट ‘अंग्रेजी मीडियम’ ची लंडनमध्ये शूटिंग करत आहे. १ वर्षानंतर न्यूरो एंडोक्राइन ट्यूमरचा उपचार केल्यानंतर भारतात परतल्यानंतर इरफान खान सध्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर सुद्धा दिसणार आहे. यामध्ये करिना महिला पोलीसाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील करिनाच्या लुकचा फोटो चाहत्यांसमोर आला आहे. हा फोटो सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे.

चित्रपटाचे समीक्षक तरण आदर्शने रविवारी करिनाच्या लुकचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. यानंतर करिनाला युजर्सने ट्रोल करण्यास सुरुवात केली. करिनाच्या या फोटोला पाहिल्यानंतर युजर्स म्हणाले की, जायरा वसीमसारखी आता करिना ही निवृत्त व्हायला पाहिजे.  दुसऱ्या युजर्सने तिला ‘आंटी’ म्हणले आहे. करिनाने एका मुलाखतीत सांगितले की, ‘ मला ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात काम करण्याची उत्सुकता खूप होती कारण मला इरफान खानसोबत काम करण्याची संधी गमवायची नव्हती.’ या चित्रपटात भलेही माझी भूमिका छोटी आहे पण हा अनुभव खूप काही शिकवून जाईल.

करिना पुढे म्हणाली की, ‘भूमिका छोटी आहे पण इरफान खानसोबत करण्याची संधी गमवायची नव्हती,  भलेही सीन दोन किंवा तीन असो. एका कलाकाराद्वारे चांगल्या चित्रपटाचा हिस्सा झाल्यानंतर आपल्याला खूप काही शिकायला मिळते. मी यामध्ये काम करण्याचे ठरविले. मला माहित नाही ,की ही संधी मला परत मिळेल की नाही.

आम्ही खूप वेगळे कलाकार आहे. एकच भूमिका आम्ही नेहमी करत नाही. जेव्हा ही भूमिका माझ्याकडे आली तेव्हा दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी मला सांगितले की, ही खूप चांगली भूमिका आहे तू कर. भूमिका भलेही छोटी आहे पण इरफान खानसोबत काम करण्याची संधी तर मिळेल.’ ‘अंग्रेजी मीडियम’ हा चित्रपट २०१७ मध्ये आलेला इरफान खानचा ‘हिंदी मीडियम’ चा सिक्वेल आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

#Doctorsday2019 : म्हणून… साजरा केला जातो ‘डॉक्टर्स डे’ 

लहान मुलांच्या आरोग्यासाठी ‘घोळ मासा’ फायदेशीर

सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी ? 

ब्रश केल्यानंतरही तोंडाची दुर्गंधी येते का ? ही असू शकतात कारणे 

Loading...
You might also like