कारगिल विजयाचे 21 वर्ष : भारताच्या या ‘बहादुर’ची दहशत एवढी होती की पाकिस्तान म्हणत होता ‘चुडेल’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कारगिलच्या युद्धाला २१ वर्षे झाली आहेत. भारतीय सैनिकांनी कारगिल जिंकून तेथे देशाचा झेंडा फडकावला होता. १९९९ मध्ये कारगिलच्या उंच शिखरावर आक्रमण केलेल्या पाक सैनिकांना त्यांच्यावर आकाशातूनही आक्रमण होऊ शकते, याचा अंदाज नव्हता. भारतीय वायुसेनेच्या मिग-२७ लढाऊ विमानांनी आकाशातून पाकिस्तानी सैन्यावर गोळीबार सुरु केला. वायुसेनेच्या या बहादुराने पाक सैन्याच्या पुरवठा व पोस्टवर इतका अचूक आणि प्राणघातक बॉम्बहल्ला केला होता.

१७०० किमी ताशी क्षमतेसह विमान आणि जमिनीवर हवाई हल्ला करण्यात सक्षम असलेल्या या रशियन लढाऊ विमानाला कारगिल युद्धात पराक्रम दाखवण्यासाठी ‘बहादूर’ असे नाव दिले गेले. याची भीती पाकिस्तानच्या हृदयात इतकी बसली की त्यांनी त्याला ‘चुडेल’ असे नाव दिले.

जेव्हा हे विमान जमीनीच्या पृष्ठभागाजवळ उड्डाण करत होते, तेव्हा कोणतेही रडार मोठ्या मुश्किलीने ते ओळखू शकत होता. त्याचा आवाज शत्रूंच्या मनात भीती निर्माण करायचा. मात्र भारतीय वायुसेनेत ३८ वर्षांच्या कालावधीत या लढाऊ विमानाने बराच चढ-उतारही पाहिला आहे.

वायुसेनेच्या लढाऊ तुकडीला २००६ पासूनच मिग-२७ च्या या शेवटच्या आणि प्रगत ताफ्यावर अभिमान आहे. मिग-२३ बीएन, मिग-२३ एमएफ आणि प्युअर मिग-२७ अशी लढाऊ विमान आधीच सेवेच्या बाहेर गेली आहेत.

या विमानाने शांतता आणि युद्ध अशा दोन्ही काळात देशासाठी मोठे योगदान दिले आहे. ताफ्याने कारगिल युद्धाच्या वेळी शत्रूंच्या जागेवर अचूकपणे रॉकेट आणि बॉम्बने हल्ले केले होते.

हवेतून जमिनीवर अचूक निशाणा साधण्यात होते पारंगत
मिग हे आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट २७ लढाऊ विमान होते. हवेतून जमिनीवर निशाणा साधण्यात ते इतके पारंगत होते की शत्रूला कळेपर्यंत त्याला नेस्तनाबूत करत होते. हे लढाऊ विमान ताशी १७०० किलोमीटरचे उड्डाण करण्यास सक्षम होते. याव्यतिरिक्त ते चार हजार किलोग्रॅमचे वॉरहेड वाहून नेऊ शकत होते.