वडिलांनी कारगिलमध्ये पाकिस्तानला ‘अद्दल’ घडवली, मुलगा MS धोनी सारखा ‘विकेटकीपर’ आणि मॅच ‘फिनीशर’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघात सध्या एक खेळाडू अतिशय उत्तम खेळ करत असून त्याच्या वडिलांनी 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कारगिल युद्धात आपल्या प्राणांची बाजी लावली होती. तर दुसरीकडे मुलगा भारतीय क्रिकेट संघासाठी खेळत आहे. ध्रुव जुरेल असे त्याचे नाव आहे. आग्रा येथे स्थायिक असलेल्या ध्रुव जुरेल याचा भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघात समावेश करण्यात आला आहे.

आशिया चषकासाठी त्याची भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्यात श्रीलंकेत हि स्पर्धा पार पडणार आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे महत्वाची जबाबदारी म्हणजेच कर्णधारपद देण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याची शैली हि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सारखी असून तो यष्टिरक्षण देखील करतो. त्याचबरोबर महेंद्रसिंह धोनी हा त्याचा आदर्शदेखील आहे. मागील वर्षभरात त्याने केलेल्या उत्तम खेळीमुळेच त्याची भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. धोनीसारखीच त्याची आक्रमक शैली असून मोठे फटके देखील तो मारू शकतो.

ध्रुव धोनीसारखाच यष्टीरक्षक -फलंदाज
18 वर्षीय ध्रुव जुरेलची शैली हि धोनीसारखीच आहे. त्याचबरोबर तो यष्टिरक्षण देखील करतो. त्यामुळे त्याच्यात धोनीची छबी दिसते. नुकत्याच इंग्लंडमध्ये पार पडलेल्या मालिकेत त्याने आपल्या शानदार खेळीने भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्याच्या शानदार 59 धावांच्या खेळीमुळेच भारताने 262 धावांचे लक्ष सहज पार करत विजेतेपद पटकावले होते.

ध्रुवचे वडील नेम सिंह जुरेल हे ध्रुवला सैन्यात भरती करणार होते. मात्र त्याने क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आपण नाराज नसून आपण देशाची सेवा केली तसेच आपला मुलगा क्रिकेट खेळून देशाचे नाव उंचावेल असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळं क्षेत्र कोणते आहे, यापेक्षा देशासाठी योगदान देणे महत्त्वाचे आहे”, असे देखील मत त्यांनी व्यक्त केले.

आरोग्यविषयक वृत्त –