‘हनीमूनच्या पहिल्याच रात्री झाला होता सौदा, पती म्हणाला – मित्रांसोबत एक रात्र…’, करिश्मा कपूरचा धक्कादायक ‘खुलासा’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार करिश्मा कपूर ही सध्या सिनेमापांसून दूर आहे. करिश्मा आपल्या खासगी आयुष्यामुळंही अनेकदा चर्चेत राहिली आहे. करिश्मा कपूरनं उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं होतं. परंतु त्यांचं लग्न टिकलं नाही. कोर्टात 6 वर्ष खटला चालल्यानंतर 7 वर्षांतच हे नातं तुटलं. 2016 मध्ये दोघे वेगळे झाले. सध्या ती आपल्या मुलांना घेऊन वेगळं रहाते. सध्या करिश्माच्या या भूतकाळाची खूप चर्चा होताना दिसत आहे.

संजय कपूर आणि करिश्मा वेगळे झाल्यानंतर त्यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसले. करिशमानं केवळ पैशांसाठी माझ्याशी लग्न केलं, माझा वापर केला असंही संजय कपूर म्हणाला होता. करिश्मानं देखील आता असाच एक धक्कादायक खुलासा केला आहे जा वाचल्यानंतर तुम्हीही हैराण व्हाल. करिश्मानं संजयवर तिचा सौदा केल्याचा आरोप केला आहे.

करिश्मानं संजय कपूरवर आरोप केला आहे की, ते हनिमूनला गेल्यानंतर त्याच रात्र पतीनं काही मित्रांसोबत रात्र घालवण्यासाठी तिचा सौदा केला होता. मित्रांसोबत त्यानं रात्र घालवायला सांगितलं होती असं करिश्मा म्हणते. इतकंच नाही तर तिनं या गोष्टीसाठी नकार दिल्यानंतर तिला मारहाण झाली होती असंही ती सांगते.

करिश्मा पुढे सांगताना म्हणते, तिची सासूही तिचा खूप छळ करायची. बारीक सारीक गोष्टींवरून तिला माराहण करायची. इतकंच नाही तर संजयनं ताच्या भावाला तिच्यावर नजर ठेवण्यासाठी सांगितलं होतं असंही ती म्हणते.

करिश्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिनं डिजिटल डेब्यू केला आहे. अल्ट बालाजीच्या मेंटलहुड या सीरिजमध्ये करिश्मानं काम केलं आहे. तिच्या कामाचंही खूप कौतुक होताना दिसलं. या सीरिजमधून तिनं दीर्घकाळानंतर कमबॅक केलं आहे.