#Birthday SPL : अभिषेकसोबतचा साखरपुडा मोडला, संजयसोबत घटस्फोट ! नेहमीच वादात राहिलीय करिश्मा कपूरची Love लाईफ

बॉलिवूड स्टार करिश्मा कपूर आज (दि- 25 जून रोजी) 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. 90 च्या दशकात करिश्मा टॉप अ‍ॅक्ट्रेस पैकी एक आणि खूप फेमस होती. एक वेळ अशी होती की, जेव्हा अभिषेक आणि करिश्मा कपूर यांचा साखरपुडा झाला होता. हे साल होतं 2002. करिश्मा बच्चन कुटुंबियांची सून होणार होती. दोन्ही कुटुंब आनंदात होते. 2003 मध्ये हा साखरपुडा मोडला. करिश्माची लव लाईफ कायमच वादात राहिली आहे.

अभिषेक आणि करिश्मा यांचा साखरपुडा तुटण्याचं कारण करिश्माची आई बबीबता कपूर आहे असंही सांगितलं जात आहे. बबीता अभिषेकच्या करिअरला घेऊन चिंतीत होती. म्हणूनच ती करिश्माचं लग्न अभिषेकसोबत करणार नव्हती. यानंतर पुन्हा एकदा करिश्माच्या आयुष्यात प्रेमानं एन्ट्री केली. तिनं संजय कपूरसोबत लग्न केलं. परंतु हेही नातं जास्त टिकलं नाही.

29 सप्टेंबर 2003 मध्ये करिश्मानं संजय कपूरसोबत लग्न केलं. या दोघांना मुलं आहेत. मुलीचं नाव समाइरा आणि मुलाचं नाव किआन आहे. 2014 मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. 2016 मध्ये दोघेही वेगळे झाले.

संजय कपूर आणि करिश्मा वेगळे झाल्यानंतर त्यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसले. करिशमानं केवळ पैशांसाठी माझ्याशी लग्न केलं, माझा वापर केला असंही संजय कपूर म्हणाला होता. करिश्मानं देखील आता असाच एक धक्कादायक खुलासा केला होता जे वाचल्यानंतर तुम्हीही हैराण व्हाल. करिश्मानं संजयवर तिचा सौदा केल्याचा आरोप केला होता.

अशीही चर्चा आहे की, किरश्मा कपूर सध्या तिचा कथित प्रियकर बिजनेसमन संदीप तोषनीवालसोबत नात्यात आहे. दोघांच्या नात्याबद्दल खूप बोललं जात आहे.