karishma Kapoor | ‘या’ कारणामुळे मी इतकी वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर होते; करिश्मा कपूरने केला मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन : karishma Kapoor | 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची अशी जागा बनवणारी अभिनेत्री करिश्मा कपूर आज पडद्यापासून लांब आहे. 90 च्या दशकात तिने ‘दिल तो पागल है’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘हम साथ साथ है’, ‘राजा बाबू’, ‘कुली नं १’ असे एक ना अनेक चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. आता पुन्हा एकदा करिश्मा तिच्या अभिनयाचे ठसे उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. या दरम्यानच एका मुलाखतीत तिने इतकी वर्ष मोठ्या पडद्यापासून लांब राहण्या मागचे कारण ही सांगितले आहे. (karishma Kapoor)

अनेक वर्षांनी करिश्मा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘मर्डर मुबारक’ हा चित्रपट पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
या निमित्ताने करिश्मा अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहे.
नुकत्याच एका कार्यक्रमात तिने मागील काही वर्षापासून मनोरंजन सृष्टीतून ब्रेक का घेतला यावर वक्तव्य केले आहे.
यावेळी ती म्हणाली, “सिनेसृष्टीतून ब्रेक घेणे ही माझी चॉईस होती. मी खूप कमी वयात म्हणजे शाळेनंतर लगेच कामाला सुरुवात केली. मी वर्षातून सात ते आठ चित्रपट करायचे. अनेक वर्ष तर मी दिवसातून तीन किंवा चार शिफ्ट मध्ये काम केले होते.आता मला ब्रेकची खूप गरज होती. मी खूप दमले होते आणि म्हणूनच मी चित्रपटातून ब्रेक घेण्याचे ठरवले. मला शंभर दिवसांच्या लांब आउटडोर शूट शेड्युल साठी जायचे देखील नव्हते. एवढ्या दिवसांनी मी पुन्हा रुपेरी पडद्यावर दिसणार यासाठी मला कमबॅक हा टॅग दिला जाईल. तो मला अजिबात आवडत नाही. याचा वापर विशेषतः महिलांसाठी केला जातो”. (karishma Kapoor)

सध्या करिश्माचे हे वक्तव्य चर्चेचा विषय बनत आहे.
अनेक दिवसांनी पुन्हा एकदा ती पडद्यावर दिसणार असल्याने चाहते देखील उत्सुक झाले आहेत.
मर्डर मुबारक हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. होमी अदजानिया यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
या चित्रपटात करिश्मा सोबत सारा अली खान आणि अर्जुन कपूर ही झळकणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच करिश्माने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

Web Title :- karishma Kapoor | karishma kapoor reveals why she took a long break from film industry

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kalyan Crime News | तरुणीला वाचवायला गेलेल्या तरुणांना बॅट-दांडक्यांनी बेदम मारहाण

Old Pension Scheme In Maharashtra | कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक; संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा- मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन